चहलने विकेट काढताच स्टेडियममध्ये पत्नी धनश्री वर्माचा डान्स

'बीवी हो तो ऐसी', पती युजवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी धनश्रीनं काय केलं पाहा.... व्हिडीओ

Updated: Apr 6, 2022, 12:44 PM IST
चहलने विकेट काढताच स्टेडियममध्ये पत्नी धनश्री वर्माचा डान्स title=

मुंबई : राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामना नुकताच पार पडला. यामध्ये बंगळुरूने 4 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थानचा पहिला पराभव आहे. या सामन्यात विशेष लक्ष खेचून घेतलं ते युजवेंद्र चहलच्या पत्नीने. तिची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 

युजवेंद्र चहलला विकेट मिळाल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. धनश्री खूप आनंदी झाली आणि स्टेडियममध्येच उड्या मारायला लागली. ती डान्स करायला लागली. युजवेंद्र चहलचं मनोबल वाढवण्यासाठी त्याला चिअर्स करू लागली. 

धनश्रीकडे आजूबाजूचे लोक पाहात होते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 9 व्या ओव्हरमध्ये डेव्हिड विलीला युजवेंद्रने क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर धनश्री वर्मा आनंदाने नाचू लागली. तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

अनेक युजर्सनी तिच्या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हटलंय बीवी हो तो ऐसी तर कुणी तिच्या या नाचण्यावर टीका केली आहे. धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती आपल्या डान्सचे व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.