अमेरिका

ट्विटरने सस्पेंड केली अकाउंट व्हेरिफिकेशन सेवा

मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने आपली जनरल अकाऊंट व्हेरिफिकेशन सेवा सध्या सस्पेंड केली आहे. ट्विटरने यापूर्वी नुकतीच एक पॉलिसी बनवली होती. ज्याद्वारे कोणताही व्यक्ती अकाऊंट व्हेरिफाय करण्यासाठी म्हणजेच, अकाऊंटला 'ब्लू टीक' घेण्यासाठी अप्लाय करू शकत होता. यापूर्वीह ही सेवा केवळ सेलिब्रिटी, सरकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांसाठीच उपलब्ध होती.

Nov 11, 2017, 04:43 PM IST

उत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.

Nov 11, 2017, 12:45 PM IST

व्हिडिओ: वय वर्षे फक्त १२, पण डान्स असा की, व्हाल चकीत

नाव -मेसी, वय फक्त बारा वर्षे. पण, डान्स भल्या भल्यांनाही तोंडाट बोट घालायल लावेल असा. इवलूशा चिमूकलीची 'व्हॅक बॅक' नावाची सिग्नचर स्टेप पहाल तर हैराण व्हाल...

Nov 8, 2017, 11:21 PM IST

आमची परीक्षा घेऊ नका; अमेरिकेचा उत्तर कोरियाला इशारा

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाचे कवित्व जगाला नवे राहिले नाही. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचीही जगाने सवय करून घेतली आहे. असे असले तरी, त्यातील गांभीर्य मुळीच कमी होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियाला इशारा दिला आहे.

Nov 8, 2017, 08:27 PM IST

अमेरिकेत चर्चमध्ये गोळीबार, हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका सशस्त्र हल्लेखोराने चर्चमध्ये गोळीबार केला आहे. अंदाधुंद केलेल्या या गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Nov 6, 2017, 07:30 AM IST

'या वेळेस पृथ्वीवर एलिअन्स करणार अटॅक'

   पृथ्वीवर एलिअन अटॅक करणार असल्याचा दावा एका अमेरिकन नागरीकाने केला आहे. पुढच्यावर्षी पृथ्वीवर एलिअन्स अटॅक करणार असून तो यासंबंधी अमेरिकन प्रेसिडंटना भेटू इच्छित आहे. ब्रायंट जॉन्सन असे त्या तरुणाचे नाव आहे.

Nov 5, 2017, 05:13 PM IST

'ही' लस ठरेल गंभीर आजारांवर प्रभावी!

इंफ्लुएंजा च्या चार प्रमुख प्रकारांच्या मूळ जीन्स एकत्रित करून एक लस बनवण्यात आली आहे.

Nov 3, 2017, 06:37 PM IST

'ट्विटर'ची एक चूक... आणि बंद झालं ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळेसाठी डिअॅक्टिव्ह झालं होतं... 'ट्विटर'च्या एका छोट्या चुकीमुळे हे घडलं होतं.

Nov 3, 2017, 09:59 AM IST

अमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने ८ लोकांना चिरडले

अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. न्युयॉर्कच्या लोअर मॅनहटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरिअलजवळ एका ट्रकने रस्त्याने चालत असलेल्या नागरिकांना चिरडले.

Nov 1, 2017, 07:34 AM IST

अमेरिका आणि पाकिस्तानातील संबंध बिघडले, हेलिकॉप्टर केले परत

चीनसोबत वाढत्या मैत्रीनंतर पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कडूपणा आला आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवादाला थारा दिल्याने पाकिस्तानची निंदा करत तीव्र कारवाईचा इशारा दिला आहे. यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवणारे पाच हेलिकॉप्टर अमेरिकेला परत केले आहे.

Oct 31, 2017, 04:22 PM IST

समलिंगी व्यक्तिसारखे आयुष्य जगणार तो

त्याच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तो भलताच बदलला. अचानक झालेल्या आरोपाने तो भलताच गर्भगळीत झाला. तितकाच अंतर्मुखही. त्याने आता निर्णयच घेतलाय या पुढे आपलं आयुष्यच वेगळ्या मार्गाने जगायचं. तो म्हणतोय आता आता सगळं आयुष्यंच समलिंगी व्यक्तीसारखं जगायचं ठरवले आहे. 

Oct 30, 2017, 09:23 PM IST

फळनिर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारताची अमेरिकेकडे मागणी

भारत आणि अमेरिका हे उभय देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यापारी मुद्द्यांवरही दोन्ही देशांचे एकमत झाले असून, अमेरिका दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी कृषी मालांची निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर भर दिला आहे.

Oct 29, 2017, 11:34 AM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

Oct 27, 2017, 11:02 PM IST