आयपीएल

काय चाललंय क्रीडा विश्वात !

लंडन ऑलिम्पिक, इंग्लिश प्रिमियर लीग,आयपीएल आणि टेनिस स्पर्धा यामध्ये काय चालल्यात घडामोडी, यावर टाकलेला धावता आढावा.

May 16, 2012, 03:01 PM IST

चेन्नई सुपरकिंग्जचा दिल्लीवर विजय

चेन्‍नई सुपर किंग्‍सने दिल्‍ली डेअरडेव्‍हील्‍सवर 9 गडी राखून विजय मिळविला. मुरली विजय 48 तर सुरेश रैना 28 धावांवर नाबाद राहिले. चेन्नईसमोर 115 धावांचे आव्‍हान होते. मात्र मायकल हसी आणि मुरली विजय यांनी हे आव्हान लीलया पेलले.

May 12, 2012, 11:12 PM IST

मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय

कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबईने 27 धावांनी विजय मिळविला. कोलकात्‍याने 20 षटकांमध्‍ये 4 बाद 155 धावा काढल्‍या. मुंबईच्‍या विजयात मोठा वाटा उचलला तो रोहित शर्माने केलेल्या शतकाने.

May 12, 2012, 08:22 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत 'IPL' सामना

दुष्काळग्रस्तांना मदत आणि कोरडे सिंचन यावरून आघाडीत सुरु झालेल्या वादात काँग्रेसनं आज आणखी आक्रमकपणे राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे. सोनिया गांधींकडे मदत मागितल्याची टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला आज काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी खरमरीत उत्तर दिलं.

May 12, 2012, 12:05 AM IST

चेन्नईचा रॉयल्सवर ४ गडी राखून विजय

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थान रॉयल्सचा तोंडातला घास हिराहून घेतला. चार गडी राखून विजय मिळवत चेन्नईने प्ले ऑफसाठीचे आपले आव्हान कायम राखले आहे.

May 11, 2012, 12:23 PM IST

बंगळुरूने केला मुंबईचा पराभव

सलामीवीर ख्रिस गेलच्या तडाखेबाज नाबाद ८२ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने मुंबईचा ९ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा कायम ठेवल्या.

May 10, 2012, 12:16 AM IST

वॉटसनची पावरफुल्ल खेळी

शेन वॉटसनच्या धडाकेबाज ९० धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने पुणे वॉरियर्सचा ७ गडी आणि २२ चेंडू राखून दणदणीत पराभव केला. वॉटसनने ९० धावा करण्यासाठी केवळ ५१ चेंडूंचा सामना केला. राजस्थान रॉयल्सच्या या विजयामुळे आता अंतीम चार संघात पोहचण्याची चढाओढ खूपच रोमांचक वळणावर पोहचली आहे.

May 8, 2012, 08:21 PM IST

कोलकात्याचा पुण्यावर ७ धावांनी विजय

आयपीएलमध्ये आज ४७व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडरने पुण्याचा पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने पुणे वॉरियर्स समोर १५१ धावांचे आव्हान उभे केले होते. त्याचा पाठलाग करतांना पुणे संघाने निर्धारित २० षटकात ८ गडी गमावत १४३ धावा केल्या.

May 5, 2012, 07:55 PM IST

चेन्नईचा डेक्कन चार्जर्सवर १० धावांनी विजय

चेन्नई सुपर किंग्जने आज डेक्कन चार्जर्सवर १० रन्सनी विजय मिळवला. आज नाणेफेक जिंकून चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईने २० षटकात ६ गडी गमावत १६० धावा केल्या आणि डेक्कनला विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य दिले होते.

May 5, 2012, 12:01 AM IST

पंजाबचा रॉयल चॅलेंजर्सवर विजय

पंजाब संघाने 159 धावांचे लक्ष 19.3 षटकात गाठण्यात यश मिळवले. शानदार बॅटिंगने पंजाबच्या संघाने रॉयल चॅलेंजर्सवर चार विकेटने विजय मिळवला आहे.

May 2, 2012, 11:38 PM IST

गेलची एकाकी खेळी 'फेल'

कर्णधार गौतम गंभीरच्या शानदार ९३ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने उभारलेला १९१ धावांचा डोंगर पार करण्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स तोकडे पडले त्यांना केवळ १४३पर्यंत मजल मारता आली.

Apr 29, 2012, 09:35 AM IST

दादाकडून पराभवाचे खापर फलंदाजांवर

पुणे वॉरियर्सचा कर्णधार सौरभ गांगुली याने पराभवाचे सगळे खापर फलंदाजांवर फोडले आहे. तर अॅडम गिलक्रिस्टने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे.

Apr 14, 2012, 03:47 PM IST

युवी खराखुरा 'फायटर' - इरफान

युवराज सिंग हा फक्त मैदानातलाच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातलाही योद्धा आहे असं मत टीम इंडियाच्या इर्फान पठाणने व्यक्त केलं आहे. २७ वर्षीय इर्फान पठाण सध्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे खेळत आहे.

Apr 12, 2012, 05:19 PM IST

....आणि शाहरूख हसला

कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळाला आणि चेहऱ्यावरील मावळेलं हसू पुन्हा टीमचा मालक शाहरूख खानच्या चेहऱ्यावर दिसून आले. गौतम गंभीरची खेळी आणि कधी नव्हती ती लक्ष्मीपती बालाजीची धडकी भरवणारी गोलंदाजी यांच्या जोरावर बंगळूरवर कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळवता आला.

Apr 11, 2012, 01:57 PM IST

राजस्थान रॉयल्सविरोधात मुंबई जिंकेल का?

डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या मॅचमध्ये रंगतदार लढतीत मुंबई इंडियन्सनं बाजी मारली होती. आता त्यांचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थाननं आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्यामुळे त्यांचाहगी आत्मविश्वास दुणावलेला आहे.

Apr 11, 2012, 01:34 PM IST