आयपीएल

IPLमधून ललित मोदींची कायमची हकालपट्टी होणार?

भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय आज आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांची आयपीएलमधून कायमची हकालपट्टी करण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टानं बीसीसीआयला दिल्लीत विशेष सर्वसाधारण सभा घ्यायला परवानगी दिलीय. २००८-१० या कालावधीत आयपीएल अध्यक्ष राहिलेल्या मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका बोर्डानं ठेवला होता.

Sep 25, 2013, 10:12 AM IST

अंकीत चव्हाण-श्रीशांतवर आजीवन बंदी

स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाणच्या क्रिकेट करिअरचा द एन्ड झाला आहे. आय़पीएलच्या सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे आता या दोघांना आयुष्यभर क्रिकेट खेळता येणार नाही.

Sep 13, 2013, 04:57 PM IST

`माशूमा`साठी शॉन टेट भारतात स्थायिक होणार?

‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ असं म्हणत ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर शॉन टेट मुंबईमध्ये स्थायिक होण्यासाठी सज्ज झालाय.

Aug 12, 2013, 11:15 AM IST

स्पॉट फिक्सिंगने केला क्रिकेटचा घात- द्रविड

धर्माप्रमाणे जपल्या जाणा-या क्रिकेटचा आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाने घात केला. कोट्यवधी फॅन्सच्या आशा आकांक्षांचा चुराडा करणा-या फिक्सिंगमुळे जंटलमन्स गेममधील जंटलमन अशी ओळख असणारा राहुल द्रविडही निराश झाला आहे.

Aug 6, 2013, 05:09 PM IST

बीसीसीआयची चौकशी समितीच बोगस - हायकोर्ट

मुंबई हायकोर्टानं स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं दिलेल्या अहवालाला कचऱ्याची टोपली दाखवलीय. एव्हढंच नाही तर बीसीसीआयनं नेमलेली चौकशी समितीच नियमबाह्य असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय

Jul 30, 2013, 01:45 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग : श्रीनिवासन, मयप्पन यांना क्लीन चीट

एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पान आणि राज कुंद्रा यांना क्लीन चीट मिळाली आहे. द्वीसदस्यीय समितीनं आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला

Jul 28, 2013, 04:52 PM IST

फिक्सिंग : दोन फरार बुकी मुंबई क्राईम ब्रँचसमोर

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणातले दोन फरार बुकी संजय आणि पवन जयपूर आज मुंबई क्राईम ब्रँचसमोर हजर झालेत.

Jul 25, 2013, 12:35 PM IST

आयपीएलचे ‘ऑपरेशन क्लीन-अप’

आयपीएल प्रकरणाची चौकशी चालू असतानाच ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीनं आयपीएल ‘ऑपरेशन क्लीन अप’चा नवीन मसुदा मांडलाय.

Jun 11, 2013, 11:02 AM IST

राज कुंद्रा बीसीसीआयकडून निलंबित

आयपीएल स्पर्धेमध्ये सट्टेबाजी केल्याच्या आरोपात अडकलेल्या राज कुंद्रा यांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) घेतला. राज कुंद्रा हा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा सहमालक आहे.

Jun 10, 2013, 02:46 PM IST

‘मी इस्लामी... हरामाचा पैसा घेणार नाही’

आयपीएलमधील टीम कोलकाता नाईट रायडरचा मालक आणि बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुखनं पहिल्यांदाच सट्टेबाजीवर आपलं तोंड उघडलंय. किंग खाननं एका मुलाखतीदरम्यान स्पॉट फिक्सिंगबद्दल आपली मतं व्यक्त केलीत.

Jun 8, 2013, 07:44 PM IST

राजच्या अर्धांगिनीनं सट्ट्यातही दिली त्याची साथ!

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राच नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील सट्टेबाजीमध्ये सहभागी होती.

Jun 6, 2013, 07:52 PM IST

बांग्लादेशातही `मॅच फिक्सिंग`, अशरफूल निलंबित

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीगला फिक्सिंगचा डाग लागल्यानंतर बीपीएल म्हणजेच बांग्लादेश प्रीमिअर लीगवरही हाच डाग पसरलाय.

Jun 4, 2013, 05:04 PM IST

श्रीसंतसहीत २२ जणांवर मोक्का दाखल!

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्यानं श्रीसंतसहीत २२ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १८ जूनपर्यंत वाढ झालीय.

Jun 4, 2013, 04:42 PM IST

बीसीसीआयच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा!

आयपीएल मधील मॅच फिक्सींग वरुन सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नाहीत, मात्र, बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

May 31, 2013, 08:52 PM IST

तोंड उघडण्यासाठी धोनी बघतोय योग्य वेळेची वाट!

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा नकार दिलाय. योग्य वेळ आल्यावर मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, असं धोनीनं लंडनमध्ये म्हटलंय.

May 30, 2013, 04:52 PM IST