एसटी संप

एसटी संपावर तोडगा निघणार, उद्धव ठाकरेंची मध्यस्थी

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.

Oct 20, 2017, 11:13 AM IST

एसटी संपामुळे रेल्वेवर ताण, लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे

  राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.

Oct 20, 2017, 11:10 AM IST

एसटीच्या संपात मुख्यमंत्री करणार हस्तक्षेप?

बोलणीच पुढे होत नसल्याने आजही डेडलॉक कायम आहे. संपाचा चौथा दिवस असून संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान, आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Oct 20, 2017, 10:30 AM IST

संपाचा चौथा दिवस, तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाचा चौथा दिवस उजाडला तरी संपावर तोडगा निघत नाही. ऐन दिवाळीत सुरु असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दिवाळी सण असल्याने मुंबईतील चाकरमानी दिवाळीसाठी गावाला निघालाय. मात्र एसटी नसल्याने या सगळ्यांनी खासगी गाड्यांची वाट धरली आहे.

Oct 20, 2017, 08:48 AM IST

एसटी संप : राज्यात प्रवाशांचे हाल आणि त्यात प्रवाशांची लूट

संपामुळे एसटीची सेवा पूर्णत: ठप्प आहे. रत्नागिरीत सेवा कोलमडली असून कोल्हापुरात संपामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच आहेत. त्याशिवाय प्रवाशांची लूटही सुरु झालीय. खासगी बसेसनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केलीय. तर अहमदनगर येथे स्कूल बसचा आधार घेण्यात आलाय.

Oct 19, 2017, 03:58 PM IST

एसटी संप : उद्धव ठाकरे गप्प का ?

एसटीचा संप तिसऱ्या दिवशी सुरुच आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले अनेक लोक दिवाळीसाठी घरी पोहोचू शकलेले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अशावेळी नेहमी अग्रणी असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  गप्प का, असा सवाल केला जात आहे. 

Oct 19, 2017, 02:58 PM IST

एसटी संपामुळे दोन दिवसात ५० कोटींचे नुकसान

एसटीचा संप आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. या संपाचा मोठा आर्थिक  फटका बसलायाय. संपाच्या दोन दिवसांत एसटीचे ४५ ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता आजपासून एसटीचे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसे संकेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत. 

Oct 19, 2017, 01:13 PM IST

एसटी कामगार कर्मचारी संपात फूट?, ८ गाड्या पोलीस बंदोबस्तात रवाना

एस टी कर्मचारी संपात फूट पडल्याचे दिसत आहे. भोर एसटी डेपोतून ८ गाड्या मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 

Oct 19, 2017, 11:12 AM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा नाही

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत एसटीनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसत आहे. तर दुसऱ्या बाजूला संपामुळे खासगी वाहनचालकांनी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.

Oct 18, 2017, 11:34 PM IST