close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कुलभूषण जाधव

कुलभषण जाधव यांची पत्नी, आईसोबत उद्या होणार भेट

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कारागृहात बंदिवान बनविलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई उद्या (25 डिसेंबर) भेटणार आहेत.

Dec 24, 2017, 11:43 AM IST

पाककडून कुलभूषण जाधव यांच्या आई-पत्नीला वीजा मंजूर

पाकिस्तानच्या तावडीत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाककडून वीजा मंजूर करण्यात आलाय. 

Dec 20, 2017, 09:20 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या पत्नी, आईच्या व्हिसा अर्जावर विचार सुरू : पाकिस्तान

पाकिस्तानचे  परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाधव यांच्या कुटुंबियांकडून पाठवलेल्या व्हिसा अर्ज भेटल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली.

Dec 17, 2017, 12:13 PM IST

कुलभूषणच्या पत्नीला एकटं पाकमध्ये पाठवण्यास भारताचा नकार

पाकिस्ताननं गुप्तहेरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आईला आणि पत्नीला पाकिस्तानात जाण्याची इच्छा आहे. परंतु, भारत सरकार मात्र कुलभूषण यांच्या पत्नीला एकटं पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. 

Nov 21, 2017, 11:37 AM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार

पाकिस्तानच्या तुरूंगात बंदिस्त असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता. त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निकाल देणार आहे.

Sep 13, 2017, 12:19 PM IST

कुलभूषण जाधवच्या आईला मिळणार पाक व्हिजा?

पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हीसा देण्यासंदर्भात पाकिस्तान विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय

Jul 13, 2017, 11:03 PM IST

कुलभूषण जाधव : पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली कबुली

पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. कुलभूषण जाधवांचं पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणण्यात आल्याचं पाकिस्तानच्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं मान्य केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं गेल्या वर्षी ३ मार्च रोजी जाधवला पाकिस्तानच्या बलूचिस्तानमधून अटक केल्याचा दावा चुकीचा असल्याचंच सिद्ध होतंय. इराणमधून बलूचिस्तानात नेऊन तिथं अटक दाखवण्यात आली.

May 25, 2017, 11:52 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानी वकिलांची फी माहीत आहे का?

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून वकील हरीश साळवे यांनी केवळ एक रुपया मानधन म्हणून घेतलं... पण, तुम्हाला हे माहीत आहे का की पाकिस्तानची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्यासाठी पाकिस्तानचे वकील खैबर कुरैशी यांनी किती मानधन घेतलं...?

May 19, 2017, 10:18 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती : संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी चर्चा 

May 18, 2017, 08:00 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...

 आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.  आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. 

May 18, 2017, 07:30 PM IST

पाकिस्तानचा रडीचा डाव, पाहा काय केलं

 आंतरराष्ट्रीय कोर्टानं चपराक लगावल्यानंतरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला मान्य नसल्याचं पाक परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीज झकेरीयांनी सांगितलंय.

May 18, 2017, 07:01 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष

कुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष

May 18, 2017, 06:16 PM IST