खड्डे

खड्डय़ामुळे पोलिसाचा दुर्देवी अंत

 खड्ड्यांमुळे सामान्य नागरीकांचे जीव गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. वाशीगाव सिग्नल येथील रस्त्यावर एका पोलिसाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतोष शिंदे (४२) असे यांचे नाव असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.   स्ट्रीट लाइट बंद असल्यामुळे काळोखातून रस्त्यावरील खड्डे चुकवत जाताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा विघ्नेश (१३) आणि मुलगी सई (८) असा परिवार आहे. शिंदे यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Sep 8, 2017, 09:11 AM IST

कर्जत महामार्गाची चाळण, सरकारी बाबूंची उडवा-उडवी

कल्याणहून पुण्याला जाण्यासाठी महत्त्वाचा असललेल्या कर्जत महामार्गाची बदलापूरपासून अतिशय दूरावस्था झालीय.

Aug 24, 2017, 04:47 PM IST

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा यंदाचा प्रवासही खड्यातून

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. त्यामुळे कोकणात येणा-या लाखो गणेश भक्तांना याच खड्यातून गावाकडे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे.

Aug 8, 2017, 11:20 PM IST

शहरभर खड्ड्यांचं जाळं

शहरभर खड्ड्यांचं जाळं

Aug 5, 2017, 09:27 PM IST

आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल? हायकोर्टाचा सवाल

 आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल?  असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला केलाय. 

Aug 3, 2017, 02:51 PM IST

'पर्यटननगरी' रायगडमध्ये भरलंय खड्ड्यांचं प्रदर्शन

खरं तर रायगड जिल्हा म्हणजे पर्यटननगरी... कारखानदारीही वाढते... पण इथं येण्यासाठीचा तुमचा रस्ता खडतर बनलाय... कारण इथं रस्ते आहेत की खड्डे असा प्रश्न पडतोय.

Jul 26, 2017, 11:09 AM IST

भिवंडीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

भिवंडीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

Jul 26, 2017, 10:47 AM IST

खंडोबाचा खड्ड्यांसोबतचा सेल्फी व्हायरल

मुंबईतल्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेवर सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगलीये. पावसाळा सुरु झाला की ठिकठिकाणी खड्ड्यांचे राज्य दिसू लागते.

Jul 22, 2017, 10:26 PM IST

मुंबईतल्या खड्डे पडलेल्या रस्त्यांना महागडा 'मिडास टच'

मुंबईतल्या रस्त्यात पडणा-या खड्ड्यांना आता चक्क मिडास टच मिळणार आहे. रस्त्यात वारंवार पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका देशी कोल्ड मिक्सचा वापर करायची. पण आता चक्क विदेशी तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलंय. 

Jul 21, 2017, 08:23 PM IST