गणपती उत्सव

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप

आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तीभावाने आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला. 

Aug 26, 2017, 11:35 PM IST

सचिन तेंडुलकरच्या घरचा बाप्पा, दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले. सचिन आणि अंजली यांनी बाप्पाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर सचिनने गणेशभक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात.

Aug 25, 2017, 06:44 PM IST

दुबईत चक्क मॉलमध्ये बाप्पा

शहरातील मिनाबाजार मॉलमध्ये चक्क श्री गणेशाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. दुबई, शारजा, अबुधाबी या भागात मोठ्या प्रमाणात मराठी आणि भारतीय बांधव राहतात. त्यांच्याकडं घरगुती गणेशोत्सव असतो. त्याशिवाय महाराष्ट्र मंडळामार्फत सार्वजनिक गणेशोत्सवही साजरा होतो. 

Aug 22, 2017, 11:58 PM IST

कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन

कोकणातल्या गणेशोत्सवाची सुरुवात भाद्रपद प्रतिपदेपासून झाली आहे. कोकणातल्या देवरुख येथील पहिल्या मानाच्या गणपतीचं आगमन आज झाले.

Aug 22, 2017, 07:49 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे

  गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. 

Aug 18, 2017, 07:38 PM IST

गणेशोत्सवात महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान २३ ऑगस्टपासून आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आलेय.

Aug 4, 2017, 07:59 AM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

Jul 15, 2017, 08:19 AM IST

काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पाद्य पूजन

पुढच्या महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झालेय. काळाचौकी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचे पाद्य पूजन मोठ्या उत्साहात झाले.

Jul 13, 2017, 01:00 PM IST

गणपतीसाठी एसटीच्या जादा गाड्या, २५ पासून आरक्षण

पुढच्या महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झाली. कोकण रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळलाय. अनेक गाड्यांचे बुकींग फुल्ल झालेत. आता एसटी महामंडळाने गणेशभक्तांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 12, 2017, 03:57 PM IST

कोकण रेल्वेच्या गणपती विशेष गाड्या फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, आरक्षण सुरु होताच पहिल्या दिवशी सर्व गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे मध्य रेल्वेला आणखी जादा सोडाव्या लागणार आहेत.

Jun 7, 2017, 10:25 AM IST