गणपती उत्सव

गणपती उत्सवाची शाळा, कॉलेजला 5 दिवसांची सुट्टी?

राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. विशेष कोकणात जोरदार तयारी असते. त्यामुळे शाळा, कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी जोर धरते. गतवर्षी शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांची सुट्टी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही मागणी मान्य झाली तर मुंबईत शाळा, कॉलेजना पाच दिवसांची सुट्टी मिळेल.

Aug 27, 2015, 12:57 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

Aug 12, 2015, 02:50 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

Jul 28, 2015, 01:27 PM IST

गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य. ज्यानं तुमचा गणपतीबाप्पा एकदम खूष होऊन जाईल. अतिशय क्रिएटीव्ह आणि इनोव्हेटिव्ह मोदकांची व्हरायटी खास तुमच्यासाठी.

Aug 29, 2014, 12:22 PM IST

गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

 गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.

Aug 29, 2014, 08:54 AM IST

मुंबई पालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी

अखेर गणपतीनं महापालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी दिलीय. गणपतीच्या आगमनाची महापालिकेनं तयारी केलीय. त्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Aug 7, 2014, 08:25 AM IST

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jul 15, 2014, 11:09 AM IST

गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, ८ जणांचा मृत्यू

राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. राज्यात तब्बल आठ जणांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मृत्यू झालाय.

Sep 19, 2013, 09:53 AM IST

गणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.

Sep 18, 2013, 01:14 PM IST

बाप्पाची लगबग, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सारा आसमंत बाप्पा मोरयाच्या जयघोषात न्हाऊन निघालाय. पुढील १० दिवस हा उत्साह वाढतच जाणार आहे. सा-यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Sep 9, 2013, 08:15 AM IST