ठाणे

कुळ, अपुरं, खोडशी... ठाण्यात भरलंय रानभाज्यांचं फेस्टिव्हल

पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला लागतात... शहरात तर या भाज्या मिळणं तसं कठिणच असतं... शहरात राहणाऱ्या लोकांना या वेगवेगळ्या भाज्यांची माहिती व्हावी, यासाठी ठाण्यात रानभाज्यांच्या फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. 

Jun 22, 2017, 06:03 PM IST

ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी, प्रवाशाला बदडले

 शहरात रिक्षाचालकाची पुन्हा एकदा मुजोरी पाहायला मिळाली. प्रवाशाकडे दोन रुपये कमी होते म्हणून प्रवाशाला रिक्षाचालकानं बदडलं. मात्र हे पाहून इतर नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिला आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेला.

Jun 21, 2017, 12:15 AM IST

फसवणूक : ठाण्यात पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध

ठाणे पोलिसांनी गेल्या एक महिन्यांपासून पाळत ठेवून दोन पेट्रोल पंपावर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेने लावला. 

Jun 20, 2017, 10:05 PM IST

ठाण्यात सतीश आव्हाड यांचे वृद्धापकाळाने निधन

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वडील सतीश भाऊराव आव्हाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ज्युपिटर रुग्णालयात  त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jun 18, 2017, 10:35 AM IST

ठाण्यात पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन फसवणूक, टोळीला अटक

पेट्रोलपंपामध्ये छेडछाड करुन ग्राहकांची मोठी फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं पर्दाफाश केला आहे. 

Jun 18, 2017, 07:20 AM IST

ठाण्यातील तरुणीचा विनयभंग करणारे दोघे अटकेत

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. यांत रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

Jun 14, 2017, 05:39 PM IST