ठाणे

चार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ

चार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ

Jun 9, 2017, 07:05 PM IST

चार एफएसआयही अपुराच - नगररचना तज्ज्ञ

ठाणे, मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईतल्या जुन्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास आता शक्य होणार आहे. सरकारच्या 'क्लस्टर डेव्हलपमेंट' योजनेला हायकोर्टानं दिलेली स्थगिती उठवलीय. आता लवकरच याबाबत अधिसूचना काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. परंतु, ठाण्याच्या नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी मात्र चार एफएसआय पुरेसा नसल्याचं म्हटलंय. खऱ्या अर्थानं शहरांचा विकास करायचा असेल तर याचा विचार व्हावा, असं त्यांनी म्हटलंय.

Jun 9, 2017, 05:49 PM IST

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’वरील स्थगिती उठवली

जुन्या इमारतींच्या सामूहिक पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ या योजनेंतर्गत चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यास पायाभूत सुविधांवर परिणाम होणार असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई शहरांविषयी आघात मूल्यांकन अहवाल (इम्पॅक्ट असेसमेंट) सादर झालेला असल्याने आता या शहरांसाठी योजनेवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दोन अर्जांद्वारे केली होती. तो अर्ज मान्य करत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने क्लस्टर डेव्हलपमेंटवरील स्थगिती उठवलीये. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील क्लस्टरचा मार्ग मोकळा झालाय.

Jun 9, 2017, 03:57 PM IST

ठाण्यात चालत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग

ठाण्याच्या तीन हात नाका येथून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीचा  सहप्रवासी आणि रिक्षाचालकाने विनयंभग केल्याची घटना घडलीये. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे घडले. 

Jun 9, 2017, 11:12 AM IST

ठाण्यात जिवंत ५९ बॉम्ब निकामी करणार

 कचऱ्यात सापडलेले जिवंत ५९ बॉम्ब रितसर परवानगी घेऊन निकामी करण्यात येणार आहेत.

May 31, 2017, 09:30 PM IST

भिवंडीत सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी

निवडणुकी आल्या की घराणेशाही किंवा पैसावर तिकीट विकत दिली जातात. यामुळे चांगली पात्रता असलेले उम्मेदवार फारच कमी दिसतात. परंतु सध्या भिवंडीमध्ये चित्र जरा उलटे दिसले. सर्वात लहान २३ वर्षीय उच्चशिक्षित रिशीका विजयी झाली.

May 28, 2017, 10:21 PM IST