धुळे

धुळ्यात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील ५ जणांचा बळी

शहरातील पाचकंदील भागात अग्नी तांडवाने एकच कुटुंबातील पाच जणांचा बळी घेतला आहे. पाचकंदील परिसरातील कापड बाजाराच्या बाजूला राहणा-या राम शर्मा यांच्या घराला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. शर्मा यांच्या घरात यायला आणि जायला एकाच दरवाजा असून इतर तिन्ही बाजूनी भिंती असल्याने घरातील एकही व्यक्तीला घराबाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. या अग्नितांडवात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात राम शर्मा, त्यांच्या आई शोभाबाई छबूलाल शर्मा, पत्नी जयश्री, बारा वर्षांचा मुलगा साई आणि दहा वर्षांचा मुलगा राधे यांचा मृत्यू झाला आहे.

Mar 26, 2017, 09:52 AM IST

धुळ्यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा लाच घेताना अटक

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल दोन लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

Mar 22, 2017, 08:52 AM IST

धुळे डॉक्टर मारहाण प्रकरण : डॉक्टरांच्याच दोन गटांत वाद

डॉक्टरांच्याच दोन गटांत वाद

Mar 15, 2017, 08:57 PM IST

धुळ्यात डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीची आत्महत्या

धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी प्रदीप सदाशिव वेताळ यानं पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Mar 14, 2017, 06:59 PM IST

धुळ्यात निवासी डॉक्टरांना नातेवाईकांची मारहाण, डोळाच फोडला

शहरातील सर्वोपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडलीय. डॉ. रोहन मामुणकर असं या डॉक्टरांचं नाव असून ते निवासी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा डोळा निकामी झालाय. याप्रकरणी 9 जाणांना अटक झाली.

Mar 14, 2017, 08:50 AM IST

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे शहरात एका अल्पवयीन मुलीने युवकांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

Mar 12, 2017, 05:35 PM IST