नोटबंदी

'नोटबंदीनंतर कर उत्पन्न 25 टक्क्यांनी वाढलं'

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर मोठ्या प्रमाणात घसरणार नाही असा विश्वास आज अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय.

Jan 9, 2017, 04:00 PM IST

राष्ट्रवादीचं बँक ऑफ इंडिया समोर म्हशी बांधून आंदोलन

आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी बँकेसमोर आणलेल्या म्हशी बँकेमध्ये घुसवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून आंदोलकांना रोखलं. त्यामुळं पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झोंबाझोंबी झाली.

Jan 9, 2017, 03:55 PM IST

अमरावती नोटबंदी विरोधात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

शहरात नोटबंदी विरोधात काँग्रेसच्यावतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Jan 7, 2017, 07:11 PM IST

भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केला : काँग्रेस

भाजप सरकारने काळा पैसा पांढरा केल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. नोटाबंदी नंतर आजची परिस्थिती गंभीर, बॅकेत जमा झाले जितके सांगितले तितके जमा. यावरून काळापैसा सगळा पांढरा झाला आहे. भाजपच्या माध्यमातून पांढरा झाला असा आमचा आरोप, असा हल्लाबोल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला.

Jan 7, 2017, 05:52 PM IST

'मोदींना हटवून आडवाणींना पंतप्रधान बनवा'

देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हटवून लालकृष्ण आडवाणींना देशाचं नेतृत्व द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे.

Jan 6, 2017, 06:11 PM IST

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावेल - राष्ट्रपती

 नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती काही काळासाठी मंद होईल. त्यामुळे होणाऱ्या त्रासातून गरिबांची सुटका करण्यासाठी सरकारनं खूप काळजी घेतली पाहिजे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय.

Jan 5, 2017, 10:13 PM IST

२००० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या फॅक्टरीचा भांडाफोड, बाजारात ७० लाख चालविलेत

देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे  सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.

Jan 5, 2017, 05:46 PM IST

खूशखबर! सरकार या व्यक्तींच्या खात्यात जमा करणार १.५० लाख रुपये

प्रत्येकाला जवळपास दीड लाख रुपये देण्याचा निर्णय

Jan 3, 2017, 01:08 PM IST

नोटबंदीचा फटका उद्योगाला, उत्पादकता घसरली

नोटाबंदीचा फटका देशाच्या उत्पादनाला बसल्याचं स्पष्ट झालंय.

Jan 2, 2017, 10:04 PM IST