नोटबंदी

'घरच्यांसोबत न राहिल्यामुळे मोदींना काय चाललंय कळत नाही'

घरच्यांसोबत न राहिल्यामुळे समाजात काय चाललं आहे हे मोदींना कळत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

Dec 23, 2016, 08:06 PM IST

राम राम जपना, गरिब का माल अपना!

राम राम जपना, गरिब का माल अपना, अशा कठोर शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.

Dec 23, 2016, 07:04 PM IST

नोटबंदी हा मोदींचा शेवटचा निर्णय नाही - अरविंद पनगरिया

नोटबंदीनंतर देशात अनेक बदल पाहायला मिळाले. ४४ दिवसानंतर ही विरोधक या मुद्द्यावर टीका करत आहेत. अनेकांना रोख रक्कमची चणचण भासत आहे. अनेक जण पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांनी देखील वक्तव्य केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशाच्या विरोधात मोदींचा हा निर्णय शेवटचा निर्णय नाही आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशावर सरळ हल्ला करण्यासाठी मोदी आणखी असे अनेक निर्णय घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.

Dec 22, 2016, 11:05 PM IST

१ रुपयात साडी, महिलांची खरेदीसाठी झुंबड

कर्नाटकमधील बिदर येथे एका छोट्या साडी व्यापाऱ्याने चक्क एक रुपयांत साडीची ऑफर दिली आहे.  

Dec 22, 2016, 01:03 PM IST

मोदींकडून नोटबंदीला विरोध करणाऱ्यांची तुलना पाकिस्तानशी

 नोटाबंदीला विरोध करणाऱ्याचा समाचार घेताना मोदींनी त्यांची तुलना पाकिस्तानशी केली.

Dec 22, 2016, 12:21 PM IST

नोटबंदी यांनी धुवून घेतले हात...

नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. 

Dec 21, 2016, 11:10 PM IST

नोटाबंदीनंतर आता गॅस अनुदानावर कुऱ्हाड

 चलनशुद्धीकरणाच्या धाडसी निर्णयानंतर आता सरकारची नजर गॅसच्या अनुदानावर पडली आहे. 

Dec 21, 2016, 09:15 PM IST

नोटबंदीनंतर चंद्रबाबू नायडू यांनी दर्शवली नाराजी

नोटाबंदी होऊन चाळीस दिवस उलटले तरी फारशी लोकांचा त्रास कमी झालेला नाही, असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडूंनी म्हटलंय. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. चाळीस दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलगू देसम पक्षाच्या आमदार, खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं.

Dec 21, 2016, 05:16 PM IST

अजब रिक्षावाला, चिकटविल्या १ हजारच्या नोटा, फोटो व्हायरल

 बँकांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर एक रिक्षावाल्याचे दोन फोटो खूप व्हायरल होत आहेत. यात त्याने आपल्या ऑटो रिक्षाला संपूर्ण १ हजार रुपयांच्या नोटा टिकटविल्या आहे. 

Dec 21, 2016, 05:08 PM IST

कल्याण येथे जुन्या नोटा बदलणाऱ्या बॅंक मॅनेजर, बिल्डरसह एकाला अटक

मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जुन्या नोटा बदलणाऱ्या गुन्हेगार मंडळींनी काळ्या बाजारात नव्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला. नोट बदलून देण्याप्रकरणी एका बॅंक व्यवस्थापकासह बिल्डर आणि अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडही जप्त करण्यात आलेय.

Dec 21, 2016, 08:07 AM IST

नोटाबंदीनंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार थेट बँकेत

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करण्याचा नवा अध्यादेश सरकारच्या विचाराधीन आहे. आज होणाऱ्या कॅबिनटच्या बैठकीत याविषयी महत्वाचा निर्णय अपेक्षीत आहे.

Dec 21, 2016, 07:56 AM IST