पाकिस्तान

पाक कलावंतांच्या मुद्यावर मनसेची माघार; शिवसेना काय करणार?

पाकिस्तानी गायक अदनान सामीला केंद्र सरकारनं अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. या प्रकारानं व्यथित झालेल्या मनसेनं आता पाकिस्तानी कलावंतांना विरोध करण्याची भूमिकाच मागे घेण्याचं ठरवलंय तर दुसरीकडं शिवसेनेची मात्र यावरून चांगलीच कोंडी झालीय.

Aug 6, 2015, 11:52 AM IST

जाणून घ्या: दहशतवादी कासिम खानबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर इथून जिवंत पकडला गेलेला दहशतवादी कासिम याच्याबद्दल चौकशीत अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. तो सतत आपला जबाब बदलतोय. सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशननंतर एक दहशतवादी ठार झाला तर दुसऱ्याला पकडण्यात आलं.

Aug 6, 2015, 09:33 AM IST

कसे पकडले काश्मिरी गावकऱ्यांनी अतिरेक्याला

 जम्मू काश्मिरीच्या गावकऱ्यांच्या धाडस आज साऱ्या भारताने पाहिलं. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोघा पैकी एका दहशतवाद्याला नागरिकांनी मोठ्या शिताफीने सिमरोळी भागात पकड़ले. 

Aug 5, 2015, 10:30 PM IST

जिवंत पकडलेला दहशतवादी म्हणाला, असं करायला मजा येते!

भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ल्यानंतर येथे पकडण्यात आलेला जिवंत दहशतवादी मोहम्मद नवेद याने  म्हटले आहे की, असे हल्ले करण्यात मजा येते.

Aug 5, 2015, 09:26 PM IST

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसिम अक्रमवर गोळीबार

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसिम अक्रमवर गोळीबार करण्यात आला आहे. वसिम अक्रमच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, यात वसिम अक्रम बचावला असल्याचं सांगण्यात येत आहे. वसिम अक्रमवर गोळीबार का करण्यात आला याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

Aug 5, 2015, 05:40 PM IST

भाजप सरकारचे पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट : मनसे

पाकिस्तानी कलाकार अदनान सामीला पुन्हा भारतात राहण्याची केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप सरकार पाकिस्तानी कलावंताना रेड कार्पेट का घालत आहे ?

Aug 5, 2015, 04:07 PM IST

फोटो: कसाबनंतर पहिल्यांदा जिवंत दहशतवादी पकडला

उधमपूरला बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलंय. कासिम खान असं त्या दहशतवाद्याचं नाव आहे. 

Aug 5, 2015, 02:05 PM IST

सावधान! दिल्लीत 9 दहशतवादी शिरले, हाय अलर्ट जारी - रिपोर्ट

देशाच्या राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आलंय. पाकिस्तानातून 9 संशयित दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं सगळीकडे सावधगिरी बाळगली जातेय.

Aug 5, 2015, 01:51 PM IST