बेळगाव

शिवसेना आणि भुजबळांचं एकमत

बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी जाऊ नये, यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं एकमत झालं आहे. बेळगाव विधानसभेच्या उद्घाटनाला जाऊ नये असं पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवलंय.

Oct 8, 2012, 05:27 PM IST

बेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव

बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.

Jul 12, 2012, 01:54 PM IST

वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, ११ ठार

बेळगावमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत पावलेले सर्वजण सोलापूरचे रहिवासी आहेत.

Apr 15, 2012, 01:57 PM IST

सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...

पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष

राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.

Dec 21, 2011, 11:53 AM IST

सततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त

गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.

Dec 17, 2011, 11:04 AM IST

बेळगाव पालिका कर्नाटकने केली बरखास्त

मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने आज बेळगाव महापालिका बरखास्त केली. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. ही घोषणा कर्नाटकचे नगरविकासमंत्री सुरेश कुमार यांनी राज्य विधानसभेत केली

Dec 17, 2011, 08:48 AM IST

बेळगाव महानगरपालिका बरखास्त

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.

Dec 15, 2011, 01:50 PM IST

मराठी नगरसेवकांचा कन्नड पालिकेत राडा

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या मराठी विरोधी वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बेळगावात वाद झाला. बेळगाव महापालिकेत होणाऱ्या अभिनंदनाचा ठराव फेटाळण्यात आला.

Dec 1, 2011, 10:57 AM IST

कन्नाडींचा धिंगाणा; ठाकरेंच्या प्रतिमेची विटंबना

बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केल्याने कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली. यावढ्यावर न थांबता त्यांना देशद्रोही ठरविण्याची मागणी केली.

Nov 29, 2011, 08:14 AM IST

बेळगावच्या महापौरांचा मराठी बाणा

कर्नाटक सरकारची बेळगाव महापालिकेवर वक्रदृष्टी पडली. बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेदार यांना कर्नाटक सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली. काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Nov 6, 2011, 05:45 PM IST

बेळगाव बंदला हिंसक वळण

बेळगाव बंदला हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी दोन वाहनांची तोडफोड केलीय. तर कोल्हापूर - बेळगाव या मार्गावर बसची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Nov 4, 2011, 07:23 AM IST

मराठी संघटनांची बेळगाव बंदची हाक

बेळगावमध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या केबिनची तोडफोड केल्याने मराठी संघटना बांधवानी आज बेळगाव बंदची हाक दिली आहे.

Nov 4, 2011, 07:22 AM IST