मुंबई उच्च न्यायालय

मुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट

मेट्रोचे तिकीट दर ८ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. तर फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची शेवटी मुदत न्यायालयाने केंद्र सरकारला दिलीये.

Dec 20, 2014, 06:01 PM IST

कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर अपात्र - उच्च न्यायालय

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर पात्र नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे वेळूकर यांना आता पाय उतार व्हावे लागणार आहे.

Dec 11, 2014, 07:15 PM IST

रेल्वेला हायकोर्टाने फटकारले, लोकलमध्ये ज्येष्ठांना स्वतंत्र डबा ठेवा

लोकल ट्रेनमध्ये चढताना अनेकांची तारांबळ उडते. त्यातच फ्लॅटफॉर्म उंच असल्याने अनेकदा प्रवाशी खाली पडतात. गर्दीच्यावेळी रेल्वेत चढणे नकोसे होते. मग ज्येष्ठ नागरिकांची काय हाल होत असतील? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला चांगलेच फटकारले आहे. त्यांच्यासाठी राखीव आसन ठेवून उपयोग नाही. तर स्वतंत्र डबा ठेवा, असा स्पष्ट आदेस न्यायालयाने दिलाय.

Dec 5, 2014, 09:33 AM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्रावर सुनावणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात मृत्यू पत्रावर सुनावणी सुरु आहे. 

Dec 5, 2014, 08:27 AM IST

महिना 90,000 कमवणारा पारसी 'गरिब' - हाय कोर्ट

महिन्याला 90,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम कमावणारा प्रत्येक पारसी गरीब असल्याचा निर्वाळा, मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

Oct 24, 2014, 09:54 PM IST

48 तासांत पुणे-नागपूर विमानतळही 'इबोला'साठी होणार सज्ज

'इबोला'चं थैमान भारतात धूडगूस घालता कामा नये, यासाठी मुंबई-दिल्ली विमानतळावर आंतराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना उभारण्यात आल्यात. तशाच पद्धतीच्या उपाययोजना तातडीनं पुणे आणि नागपूर विमानतळांवरही उभारण्याचे आदेश आज मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत.

Sep 10, 2014, 05:19 PM IST

दहीहंडीमध्ये लहान मुलांना बंदी...तुमचे मत काय?

राज्यात दहीहंडी उत्सवात दहा ते आठ थर पाहायला मिळतात. मात्र, या मानवी मनोऱ्यावर शेवटच्या टोकाला असतो तो पाच ते सात वर्षांचा चिमुडा. मात्र, हा उंच मनोरा कोसळतो त्यावेळी थराच्या वरती असलेल्या लहानग्या बाळगोपालचा जीव टांगणीला असतो. अनेकदा सराव दरम्यान आणि दहीहंडीच्यावेळी अपघात घडलेत. हे अपघात पाहता जनहीत याचिका दाखल केल्यानंतर यावर आता बंदी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेय. याबाबत तुम्हाला काय वाटते. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कळवा.

Aug 12, 2014, 03:02 PM IST

डॉक्टर संपाचे 80 बळी?, मृत्यूबाबत अहवाल द्या - हायकोर्ट

नुकत्याच झालेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिका-यांच्या संपात किती रूग्णांचे मृत्यू झाले, कितीजण उपचारांपासून वंचित राहीले याचा अहवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे मागवला आहे. दोन आठवड्यात हा अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Jul 10, 2014, 09:36 AM IST

पंढरपूरमध्ये घाण कराल तर...

 पंढरपूरमध्ये यापुढे तुम्ही कचरा टाकलात किंवा घाण केलीत तर तुमचे काही खरं नाही. पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. त्याबाबत मुंबई हायकोर्टाने स्वच्छतेबाबत आदेश दिलेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमण्याची सूचना केलेय.

Jul 4, 2014, 08:23 AM IST

रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - मुंबई उच्च न्यायालय

 येत्या एक वर्षाच्या आत  म्हणजे 31 जुलै 2015 च्या आत मुंबईतल्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Jul 3, 2014, 08:24 AM IST

पेण अर्बन बँक दिवाळखोरीला कोर्टाची स्थगिती

पेण अर्बन बँक दिवाळखोर काढू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने स्थिगिती दिली आहे. बॅंकेने न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने अंतरिम स्थिगती दिलेय. त्यामुळे जवळपास १ लाख ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

May 20, 2014, 07:56 AM IST