मुंबई महापालिका

मुंबई महापौर निवडीबाबत मनसेनेने केली भूमिका जाहीर

महापालिकेत शिवसेनेचा की भाजपचा महापौर बसणार याकडे लक्ष लागले आहे. यात सर्वात महत्वाची भूमिका ही आता मनसेची असणार आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. आता मनसेनेने आपले मौन सोडले आहे. त्यामुळे आता अधिकच रंगत आलेय. 

Mar 3, 2017, 08:16 PM IST

सेना भवनातून गीता गवळी माघारी, मुख्यमंत्र्याची घेणार भेट

 शिवसेना भवनात चर्चेसाठी गेलेल्या गीता गवळी माघारी परतल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेसाठी थेट वर्षावर निमंत्रण दिलेय.

Mar 2, 2017, 05:24 PM IST

अशी होईल मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक

 मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत राज्यात उत्सुकता ताणवली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी होणार यावर चर्चा होत आहे. पण नेहमी ही प्रक्रिया कशी होणार जाणून घ्या... 

Mar 1, 2017, 07:14 PM IST

मुंबईच्या महापौरपदासाठी तीन पॉवर सेंटर्स राज्याचे लक्ष

देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये... सध्या कुणीच आपले पत्ते उघड करत नाहीये. शिवसेनेचा सूर मवाळ झाला असला आणि भाजपानंही युतीसाठी पाऊलं टाकल्याचं दिसत असलं, तरी अद्याप सगळंच अधांतरीत आहे. नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक मुख्यालयात आले, तेव्हा याचाच प्रत्यय आला... 

Mar 1, 2017, 07:03 PM IST

मुंबई महापौर कोण होणार, निवड एक दिवसआधीच

महापालिकेच्या महापौरांची निवड ८ मार्चलाच १२ वाजता होणार आहे. ४ मार्चला महापौरपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरता येणार आहे. 

Mar 1, 2017, 06:17 PM IST

मुंबई महापौर निवडणूक : एक दिवस आधी, घटनात्मक पेच?

महापालिकेच्या महापौर निवडणूक ९ मार्चला घेणे अपेक्षीत आहे. मात्र, अचानक आयुक्तांनी सुचवलेल्या बदलांमुळे महापौरपदाची निवडणूक एक दिवस आधीच म्हणजे ८ मार्चला होण्याची शक्यता आहे.

Mar 1, 2017, 04:50 PM IST

मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी जुळवून घेण्यासाठी भाजपचे पीच तयार

महापालिकेत सत्तास्थापनेसाठी मुंबईत शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना नेत्यांशी गुप्त चर्चा, झाल्याचे वृत्त आहे. झी 24 तासला सूत्रांची ही माहिती मिळाली. त्यामुळे मुंबईतल्या सत्तास्थापनेसाठी वेग आला आहे.

Feb 28, 2017, 11:11 PM IST

राज ठाकरे किंवा गीता गवळी ठरू शकतात किंगमेकर

 सध्या राज्यात सर्वत्र मुंबईत कोणाचा महापौर होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहेत. या संदर्भात विविध समिकरणं मांडली जात आहे. 

Feb 28, 2017, 06:46 PM IST

मुंबईत शिवसेनेशी पॅचअपचे भाजपाचे प्रयत्न सुरू

 मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84 आणि भाजपाच्या 82 जागा निवडून आल्याने मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. अपक्ष आणि इतर नगरसेवकांना आपल्याबरोबर घेण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केला असला तरी आता मुंबईत शिवसेनेबरोबर पॅचअप करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Feb 28, 2017, 06:09 PM IST

मुंबईत युतीबाबात शिवसेनेकडून प्रस्ताव नाही : भाजप

महापालिका निवडणुकीत शिवसेने जरी मोठा पक्ष असला तरी बहुमताचा आकडा ते गाठू शकलेले नाहीत. त्यामुळे पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली तर ते शक्य आहे. मात्र, युती होणार नाही, अशी चिन्हे सध्यातरी दिसत आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी युती करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे भाजपने म्हटलेय.

Feb 28, 2017, 04:36 PM IST

मुंबई महापालिकेतील शिवसेनेची संख्या वाढली...

 मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी शिवसेनेची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ८४ शिवसेना आणि ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर ८८ संख्या असलेल्या शिवसेनेच्या गोटात पाचवा अपक्ष आला आहे. 

Feb 28, 2017, 04:29 PM IST

मनसेमुळे शिवसेनेचे १४ उमेदवार पराभूत

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सातच नगरसेवक आले तरी मनसेकडे मते वळल्याने शिवसेनेचे किमान १४ नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यात १२ ठिकाणी भाजपचे आणि दोन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

Feb 27, 2017, 11:05 PM IST

महापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

आज मुंबई भाजप तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. पालिका कारभार कसा आहे,

Feb 27, 2017, 07:53 PM IST

शेलारांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक

मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आलीये.

Feb 27, 2017, 09:05 AM IST

भाजपने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?

भाजपने सत्ता स्थापन केल्यास तिथेही शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक महापौर आणि विविध पदावर द्यावे लागतील.

Feb 26, 2017, 10:31 PM IST