मुंबई : आज मुंबई भाजप तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. पालिका कारभार कसा आहे, काम कसे केले पाहिजे, पालिका कारभारा कसा चालतो याचे धडे आज नगरसेवकांना यावेळी दिले.
आपल्याला नवीन पारदर्शी व्यवस्था तयार करायची आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ कारभाराचे धडे आज मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना दिले. तसंच पुढे काय होईल, पद मिळेल का चिंता करू नका, लोकांच्या विश्वासाला पात्र होतो का याकडे लक्ष दया असं सांगत स्वछ कारभाराच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
महापालिकेतील भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनू नका. दोन- चार नगरसेवक इकडे तिकडे गेले तरी चालेल पण पक्षाच्या तत्वाबरोबर तडजोड करणार नाही, याची राजकीय किंमत चुकवायला पक्ष तयार असं सांगत मुख्यमंत्री यांनी पक्ष शिस्तीच्या चार गोष्टीच नवनिर्वाचित नगरसेवकांना सुनावल्या.