मोदी सरकार

काळ्या पैशाप्रकरणी मोदी सरकारचं घुमजाव

काळा पैसा परदेशी बँकांमध्ये लपवणा-या भारतीयांची नावं उघड करता येणार नाहीत, असं केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे मोदी सरकारचे हे घुमजाव असल्याचे बोलले जात आहे. भारताने अनेक देशांसोबत दुहेरी करप्रणालीसंदर्भात करार केले आहेत. त्या करारानुसार संबंधित देशांनी दिलेली काळ्या पैशांची माहिती उघड केल्यास, त्या करारांचा भंग होऊ शकतो. त्यामुळं ती माहिती उघड करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टापुढं सांगितलं.

Oct 17, 2014, 05:41 PM IST

मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. केंद्र सरकार कुंभकर्णासारखे वागत आहे, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.

Oct 10, 2014, 11:05 AM IST

जनता महागाई, भ्रष्टाचारानं त्रस्त आणि PM वाजवतायेत ढोल - राहुल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय. 

Sep 4, 2014, 09:10 PM IST

गंगा सफाई : केंद्रातील मोदी सरकारला न्यायालयानं फटकारलं

गंगा सफाईच्या धीम्या गतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकारला फटकारलयं. सध्याची योजनेनुसार 200 वर्षांपर्यंत गंगेची सफाई होणार नाही असं सांगत 3 आठवडयात नवी योजना सादर करण्याचे आदेश दिलेत.

Sep 3, 2014, 04:18 PM IST

मोदी सरकार: अजेंडा आणि आव्हानं

युपीए सरकारला सत्तेतून बाहेर फेकल्यानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बनलेल्या एनडीए सरकारला ३ सप्टेंबरला १०० दिवस पूर्ण होत आहेत. लोकसभा निवडणूक २०१४च्या निवडणूक प्रचारादरम्यान देशाच्या विकासासाठी मोदींनी जनतेकडे ६० वर्षांच्या तुलनेत ६० महिन्यांची मागणी केली होती. म्हणूनच मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कामाच्या प्रत्येक दिवसाची चर्चा होणं साहजिकच आहे. मोदी सरकारनं यावर्षी २६ मेला सत्तेचा भार स्वीकारल्यानंतर आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रानुसार काम करायला सुरूवात केलीय. 

Sep 2, 2014, 04:33 PM IST

शतकवीर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावर धूम

 2014. सत्तेमध्ये परिवर्तन. अनेक वर्षांच्या काँग्रेस राजवटीला 'दे धक्का' दिला. प्रथमच सत्तेत भाजप अर्थात एनडीएचे सरकार केंद्रात विराजमान झाले. याचे श्रेय जाते ते नरेंद्र मोदी यांना. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आले. याच सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. मोदी फिव्हर सोशल मीडियातही पाहायला मिळत आहे.

Sep 2, 2014, 11:38 AM IST

विद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे. 

Aug 26, 2014, 01:00 PM IST

मोदी सरकार आल्यानंतर जातीय हिंसेत वाढ - सोनिया

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर अल्पसंख्यांक, जातीय हिंसा वाढल्या असून महिला आणि बालकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचही त्या म्हणाल्या.

Aug 12, 2014, 04:13 PM IST

मोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?

मोदी सरकारमुळे 'आरएसएस'ला बळ मिळतंय?

Aug 12, 2014, 09:33 AM IST

केंद्रीय योजनेतून नेहरू-गांधी वारसा मोदी संपविणार?

केंद्रीय योजनेतून नेहरू गांधी यांचा वारसा संपविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्याचे संकेत दिलेल्या मोदी सरकारने आता या दिशेने पहिले पाऊल टाकण्याची सुरूवात केली आहे. 

Aug 11, 2014, 04:38 PM IST

तयार राहा; आर्थिक सर्वेक्षणातून कठोर निर्णयांचे संकेत

मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये सारं काही आलबेल असणार नाही. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून तरी हेच संकेत मिळतायत. महागाई तर कायम राहिलच, पण त्याचबरोबर डिझेल आणि एलपीजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Jul 10, 2014, 08:37 AM IST

बजेट 2014-15 : 'अच्छे दिन'साठी मोदींची कसरत

खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे पहिल्यांदाच मोदी सरकारचं बजेट मांडणार आहेत. 

Jul 10, 2014, 08:10 AM IST