विद्यार्थी

कॉलेजांमध्ये बसवणार मोबाईल जॅमर!

राज्य सरकार सध्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग कॉलेजमध्ये मोबाईल जॅमर लावण्याच्या विचारात आहे. मात्र, याला विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून विरोध होत असल्याचंच दिसतय.

Jul 8, 2013, 05:21 PM IST

अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप!

नाशिक शहरात एका अल्पावयीन मुलीवर आठ मुलांनी सामुहिक बलत्कार केल्याचं उघड झालं आहे. मुलीने तक्रार नोंदविल्याने चार जणांना अटक करण्यात आलीये.

Jun 30, 2013, 05:27 PM IST

`छेडछाड नाही, प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर विद्यापीठात प्रवेश`

दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक महत्तवाची बातमी आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी छेडछाड करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र आता केवळ विद्यार्थ्यांना नाही तर विद्यार्थीनींनाही द्याव लागणार आहे. रामजस महाविद्यालयानं अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र बंधनकारक केलंय.

Jun 29, 2013, 03:10 PM IST

लंडनमध्ये धावणार आयआयटी विद्यार्थ्यांची रेस कार!

पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणार आहे.

Jun 23, 2013, 06:16 PM IST

गर्लफ्रेंडसाठी अल्पवयीन विद्यार्थी बनला चोर

आपल्या गर्लफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी शहरात चोऱ्या करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केलं. यातील एक तरुण अल्पवयीन विद्यार्थी आहे. रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन, पर्स इत्यादी वस्तू चोरून ही मुलं गर्लफ्रेंड्सना गिफ्ट्स देत असत.

Jun 18, 2013, 04:20 PM IST

पुण्यात विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला!

पुण्यातील कॉलेज मधील प्रवेशांसोबतच इंजिनीरिंगच्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग आलाय. मात्र ओबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी आवश्यक असणारं नॉन-क्रिमिलीअर दखले अजून न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागलाय.

Jun 16, 2013, 07:05 PM IST

विद्यार्थ्यांनी शेअर केले शिक्षिकेचे खासगी फोटो!

इतिहासचे धडे देणाऱ्या एका शिक्षिकेला आपल्या वर्गातील मुलांच्या केलेल्या कारनाम्यामुळे खजिल व्हायला लागले आहे. या घटनेने खजिल झालेल्या शिक्षिकेने शाळेत येण्यास नकार दिला आहे.

Jun 13, 2013, 04:08 PM IST

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरकारकडून `स्कूटी`!

राजस्थान सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी नवी योजना सुरू केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत ५०% गूण मिळवल्यास त्यांना सरकारतर्फे स्कूटी देण्यात येईल.

May 23, 2013, 04:48 PM IST

रॅगिंगप्रकरणी दोन विद्यार्थ्यी निलंबित

कल्याणमधल्या नितीन पडाळकर आत्महत्येप्रकरणी नेरुळच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलंय.

May 13, 2013, 03:48 PM IST

पडाळकर आत्महत्येप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा

कल्याणमधल्या नितीन पडाळकर आत्महत्येप्रकरणी नेरुळच्या डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 13, 2013, 09:19 AM IST

आश्रमशाळांमध्ये १९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू

राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या 192 विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघडकीस झाली.

May 8, 2013, 04:54 PM IST

मनसेचे विद्यार्थ्यांसाठी करिअर फेअर सुरू....

वरळीच्या जांबोरी मैदानात ज्ञानमयी करिअर फेअरचं आयोजन करण्यात आलंय. `झी २४ तास`चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या फेअरचं उद्घाटन झालं.

May 3, 2013, 03:49 PM IST

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी शिक्षक रस्त्यावर

शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यात काही महत्वाच्या बदलांसाठी आणि पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शिक्षक काल मुंबईच्या रस्त्यावर उतरले. शिक्षक, संस्थाचालक आणि पालक या तिघांच्या दुर्मिळ एकीचा प्रत्यय मोर्चात दिसून आला. राज्यभरातून हजारो शिक्षक यात सहभागी झाले होते.

Feb 3, 2013, 09:38 AM IST

वयस्क प्राचार्याचे विद्यार्थीनीशी इलूइलू

उत्तर भारतात काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या जुली-मटूकनाथ प्रेमप्रकरणाचा कित्ता गिरवत बिहारच्या गोपालगंज येथील महेंद्र दास महाविद्यालयाचे प्राचार्य संत रामदुलार दास यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी लग्न केले आहे.

Jan 28, 2013, 07:36 PM IST

चौथीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची जबर मारहाण

इयत्ता चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना मुंबईत घडलीये. कुलाब्यातल्या महापालिकेच्या शाळेत शिवम चव्हाण या चौथीत शिकणा-या लहानग्याला शिक्षकाने एवढी जबर मारहाण केली.

Nov 9, 2012, 06:56 PM IST