विद्यार्थी

पुणे-मुंबई हायवेवर अपघात, एमबीएच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळील एमटीडीसीजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं कार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून हा अपघात घडला. अपघातात वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये एमबीए करत असलेल्या एका तरुणीसह चार विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झालाय. तर एक तरुणी जखमी आहे.

Sep 30, 2013, 03:19 PM IST

नायजेरियात झोपलेल्या विद्यार्थ्यांवर गोळीबार, ५० ठार

नायजेरियातील ईशान्य भागात बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी एका कॉलेजवर हल्ला केला आणि गाढ झोपलेल्या ५० विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारलं. जवळपास २०० दहशतवाद्यांनी मध्यरात्री १ वाजता हा हल्ला केला. योबे राज्याच्या गुज्बा इथल्या कृषी महाविद्यालयात हा घातपात झाला.

Sep 30, 2013, 12:54 PM IST

सजग, विवेकी, निर्भय होवू!- विद्यार्थ्यांची मोहीम

पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.

Sep 25, 2013, 12:57 PM IST

राहुल गांधींच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी वेठीला

राहुल गांधींच्या स्वागतासाठी शाळेतल्या मुलांना संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून विमानतळावर वेठीस धरण्यात आलंय. राहुल गांधी पुण्यात येणार यासाठी काँग्रेसच्या काही चमको कार्यकर्त्यांच्या या अट्टाहासापायी या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना विमानतळावर ताटकळत ठेवण्यात आलंय..

Sep 24, 2013, 09:22 PM IST

विद्यार्थ्यांकडे `टाईमपास`साठी `टाईम`च नाही!

कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी, फॅशनेबल कपड्यांत वावरणारे आणि कट्ट्या-कट्ट्यांवर ‘टाईमपास’ करणारे तरुण-तरुणी... होय ना! पण, हेच चित्र बदलतंय किंबहुना बदललंय असंच म्हणावं लागेल.

Sep 21, 2013, 10:33 PM IST

उत्तर आलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या तोंडात दिले चटके!

संगणकावर अधारीत विचारलेला प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं सहावीच्या विद्यार्थ्याला मारहाण करुन जीभेला चटके दिल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडलाय.

Sep 16, 2013, 09:15 PM IST

शिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई

मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये क्लासेसनी दुकानं थाटलीयत, याचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आलीय. शिक्षण विभागानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. जी कॉलेजेस अशा पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसना परवानगी देतात किंवा कोचिंग क्लाससाठी कॉ़लेजच्या वर्गखोल्या उपलब्ध करुन देतात, अशा ज्युनिअर कॉलेजेसवर कारवाई करण्यात येणार आहे.

Sep 3, 2013, 09:19 AM IST

महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसची `दुकानदारी`!

महाविद्यालयांना कॅम्पसमध्ये कोचिंग क्लास चालवण्याची परवानगी दिली कोणी ? कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या या काळ्या बाजारावर कुणाचच लक्ष नाही? शिक्षण विभाग याची दखल घेणार का?

Sep 2, 2013, 09:40 PM IST

प्राध्यापक राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आज एका वेगळ्याचा भूमिकेत दिसणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे नेहमी आपल्या ठाकरी शैलीत मार्गदर्शन करतात, पण आज पुण्यात राज ठाकरे प्राध्यापक होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Aug 31, 2013, 06:05 PM IST

शासकीय हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मुंबईतल्या हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश दिला जातोय. झी मीडियाच्या हाती लागलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झालीये.

Aug 14, 2013, 03:15 PM IST

विद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!

सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.

Aug 5, 2013, 09:03 PM IST

23 महाविद्यालयांची मान्यता रद्द

23 बीएएमएस महाविद्यालयांची मान्यता रद्द झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयांत हलवण्यात आलेलं नाही. याचविरोधात गेल्या २४ दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. त्यातल्या 5 जणांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. मात्र सरकार अजूनही याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

Aug 3, 2013, 01:40 PM IST

दोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान!

दोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान.... असं घडतंय नाशिकमध्ये.... रिक्षाचालक आणि आरटीओ अधिका-यांमध्ये कारवाईच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल झाले.

Jul 29, 2013, 10:10 PM IST

राज्यात इंजिनिअरींगच्या जवळपास ६० हजार जागा रिक्त

राज्यात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडलाय. एकिकडे राज्यात इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजारोच्या संख्येने जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे राज्यचं तंत्र शिक्षण संचालनालयात संचालकासह 83 पदे रिक्त आहेत.

Jul 20, 2013, 08:33 PM IST

पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती

बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.

Jul 19, 2013, 03:16 PM IST