विधानपरिषद निवडणूक

विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांनी धुडकावला काँग्रेसचा फॉर्मुला

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले आणि जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्मुला अजित पवारांनी धुडकावून लावला.

Nov 2, 2016, 12:51 PM IST

विधानपरिषद निवडणूक : डावखरे विरुद्ध फाटक

डावखरे विरुद्ध फाटक

May 17, 2016, 11:56 PM IST

विधान परिषदेच्या ७ जागांसाठी झालं मतदान

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूकीसाठी मतदान झालं. निवडणूकीच्या निमित्तानं युती आणि आघाडीमधील कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यात...

Dec 28, 2015, 09:05 AM IST

विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

 मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर जाणा-या दोन सदस्यासांठी रविवारी निवडणूक होतेय.

Dec 27, 2015, 09:33 AM IST

छगन भुजबळांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा रंगली होती. 

Dec 6, 2015, 11:49 AM IST

भाजपकडून विधानपरिषदेसाठी तावडे, फुंडकरांना उमेदवारी

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर या दोन ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. या दोन्ही नेत्यांची ही तिसरी टर्म असेल.

Mar 9, 2014, 10:44 PM IST

विधान परिषदेसाठी काँग्रेसची राठोड, देशमुख, रघुवंशींना उमेदवारी

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवाजीराव देशमुख, हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी हे तीन उमेदवार काँग्रेसनं निश्चित केलेत. या निवडणुकीसाठी अर्जभरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी काँग्रेसनं ही यादी निश्चित केलीय. या यादीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची छाप आहे. संख्याबळाचा विचार करता हे तिन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

Mar 9, 2014, 10:25 PM IST

काँग्रेसने केली सेनेशी मैत्री, राणेंना धक्का...

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मैत्रीच्या नव्या समीकरणामुळे ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. यानिमित्तानं काँग्रेस-शिवसेनेच्या दोस्तीची चर्चा सुरू झाली.

Jul 14, 2012, 07:04 PM IST

मनसे युतीला मदत करणार?

नाशिक विधान परिषद निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापायला लागलंय. सर्वच पक्षांचे मतदार अज्ञातस्थळी रवाना झालेत.

May 23, 2012, 02:49 PM IST