विराट कोहली

मैदानात कोहली आणि गंभीरमध्ये जुंपली

आज आयपीएल मॅचदरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण जुंपलं. विराट कोहली आऊट झाल्यावर दोघांमध्ये वाद झाला. मात्र इतरांनी दोघांना अडवून वेळीच वाद आवरला.

Apr 11, 2013, 08:58 PM IST

...आणि 'विराट'चं नाव घेतंच तिनं मरण पत्करलं!

टीम इंडियाचा आघाडीचा स्टार क्रिकेटपटू आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या एका चाहतीनं आत्महत्या केलीय. ही मुलगी विराटवर एवढी फिदा झाली होती की अंतिम श्वास घेण्याआधी आपल्या वडिलांना लिहिलेल्या चिठ्ठितही तीनं विराटसाठी एक मॅसेज लिहून ठेवलाय.

Jan 8, 2013, 01:54 PM IST

क्रिकेटचा `विराट` कोहली तर पाकिस्तान सर्वोत्कृष्ठ टीम

गेल्या वर्षी भारतातर्फे सर्वाधिक रन्सचा टप्पा गाठणाऱ्या विराट कोहलीला ‘सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर’ म्हणून सन्मानित करण्यात आलंय तर पाकिस्तान क्रिकेट टीम ठरलीय ‘सर्वोत्कृष्ठ टीम’...

Jan 5, 2013, 08:55 AM IST

दुखापतीमुळे कोहलीचा एमआरआय स्कॅन

चेन्नई येथे पाककिस्तानविरूद्ध खेळताना जखमी झालेला भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीचा एमआरआय स्कॅन करण्यात आला असल्याचे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव संजय जगदाळे यांनी वृत्तसंस्थेस सांगितले.

Jan 1, 2013, 08:16 PM IST

सचिननंतर आता टार्गेट धोनी...

इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला हटवण्याची मागणी जोर धरू लागलीय. एकानंतर एक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर धोनीवर चांगलीच टीका होतेय.

Dec 18, 2012, 10:26 AM IST

विराट कोहलीचे ब्राझीलच्या मॉडेलशी ‘गॅटमॅट’

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या ब्राझीलची मॉडेल इजाबेल लीटे हिच्यासोबत डेटिंग करण्यात व्यस्त आहे.

Nov 12, 2012, 03:30 PM IST

विराट बनला `वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर`

भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याला ‘वन-डे क्रिकेटर ऑफ द ईयर’नं गौरवण्यात आलंय.

Sep 15, 2012, 10:49 PM IST

दुसऱ्या दिवसाअखेर भारत - ५/२८३

बंगळुरु टेस्टमध्ये टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर ५ विकेट्स गमावून २८३ रन्स केले आहेत.

Sep 1, 2012, 10:51 AM IST

भारतीय क्रिकेटर्सची आयसीसी पुरस्कारांमध्ये पीछेहाट

गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.

Aug 30, 2012, 04:33 PM IST

कोण होणार आयपीएलमधील मोठा हिटर?

टी-20 महासंग्रामात विजय हा बॅट्समनचाच होतो. प्रत्येक टीमची भिस्त ही टीमला विजय मिळवून देणा-य़ा चेह-यांवर असते. असे बॅट्समन जे वारंवार बॉल बाऊंड्रीच्या पार पाठवतील. आयपीएलमध्ये ख्रिस गेल पासून ते विराट कोहलीमध्ये सगळ्यात मोठा हिटर कोण ही स्पर्धा लागणार आहे.

Apr 5, 2012, 07:51 PM IST

सचिनच्या ८० शतकांचा मी साक्षीदार - कुंबळे

मास्टर ब्लास्ट आणि महाशतकवीर सचिन तेंडुलकर याच्या ८० शतकांची मी साक्षीदार आहे, असे उद् गार माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांने काढले आहेत. यावेळी कुंवळेने विराट कोहलीचे कौतुक केले.

Mar 23, 2012, 05:03 PM IST

विराट कोहलीवर फॅन्स फिदा

आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम इंडियात अढळ स्थान मिळवणारा विराट कोहली हा भारतीय फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मीरपूरमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्ध अटीतटीच्या मॅचमध्ये तर आपल्या विस्फोटक सेंच्युरीमुळे विराट प्रतिस्पर्ध्यांकरता डोकेदुखी आणि टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलाय आहे. त्याच्या याच अफाट खेळीमुळे भारताच्या एशिया कपची फायनल गाठण्याच्या आशा जिवंत आहेत.

Mar 20, 2012, 08:55 AM IST

पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे

पाकिस्तानच्या ३२९ धावांच्या पाठलाग करताना १८३ धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत आहे. कौतुक करण्यामध्ये क्रिकेट फॅन आणि कधीही कपडे उतरविण्यास तयार असलेल्या पूनम पांडेचाही समावेश आहे.

Mar 19, 2012, 01:39 PM IST

विराट कोहलीचे भविष्य चांगले - श्रीकांत

भारतीय संघातील विराट कोहली हा भविष्यातील सर्वोत्तम कर्णधार असणार आहे. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहता, भविष्यातील चांगला कर्णधार असेल, असे मत भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. विराटची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Feb 29, 2012, 04:55 PM IST

युवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदन

अमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.

Feb 29, 2012, 10:28 AM IST