विराट कोहलीचे भविष्य चांगले - श्रीकांत

भारतीय संघातील विराट कोहली हा भविष्यातील सर्वोत्तम कर्णधार असणार आहे. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहता, भविष्यातील चांगला कर्णधार असेल, असे मत भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे. विराटची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Updated: Feb 29, 2012, 04:55 PM IST

www.24taas.com, मुंबई

भारतीय संघातील विराट कोहली हा भविष्यातील सर्वोत्तम कर्णधार असणार आहे. त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहता, भविष्यातील  चांगला कर्णधार असेल, असे मत भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत यांनी  व्यक्त केले आहे. विराटची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड जाहीर केल्यानंतर श्रीकांत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. भविष्यातील कर्णधार म्हणून आम्ही विराटकडे पाहत आहोत. तो नक्कीच चांगली कामगिरी बजावेल. त्याच्यावर ही जबाबदारी येईल, असे सूचित केल्याने महेंद्रसिंग धोनानंतर विराटचा नंबर लागण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.

विराटने  श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करताना 133 रन्स केल्या.  बांगलादेशमध्ये होणाऱ्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विराटची आता जबाबदारी बाढली आहे. ही जबाबदारी विराट व्यवस्थीत पार निभावेल, असा विश्वास के. श्रीकांत यांनी व्यक्त केला.