विराट कोहली

तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Dec 30, 2014, 01:44 PM IST

अनुष्कानं मेलबर्नमध्ये गुंफला विराटच्या हातात हात!

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी दोघांनीही आपलं रिलेशनशीप लोकांपासून लपवून ठेवलेलं नाहीय. पण, दोघं ते उघडपणे कबूलही करत नाहीत... आत्ता, नुकतंच हे जोडपं ऑस्ट्रेलियात एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना दिसलं. 

Dec 26, 2014, 04:04 PM IST

विराटनं सुरा काढला आणि शिखरला खुपसला - धोनी

ब्रिस्बेन टेस्टनंतर क्रिकेटर्सच्या ड्रेसिंग रुममधल्या वातावरणात तणाव असल्याचं पहिल्यांदा जाहीर केलं ते महेंद्र सिंग धोनीनंच... पण, आज मात्र या भारतीय कॅप्टननं सगळ्याच गोष्टी मजेशीर अंदाजात उडवून लावल्या... आपल्याला वाट्टेल तशा स्टोरिज बनवणाऱ्या आणि मीडियाला देणाऱ्या खेळाडुंनाही त्यानं आपल्याच अंदाजात फैलावर घेतलं. 

Dec 25, 2014, 03:43 PM IST

अनुष्काला सोबत घेऊन विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, बीसीसीआयनं अनुष्काला सोबत घेण्यासाठी विराटला परवानगी देऊन टाकलीय. 

Dec 25, 2014, 11:41 AM IST

ट्विटरवर तेंडुलकरच्या पुढे गेला कोहली

 क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणारा भारतीय खेळाडू बनला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकून त्याने क्रमांक एक पटकावला आहे. तेंडुलकरने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर एक वर्षानंतरही या यादीत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. 

Dec 23, 2014, 07:23 PM IST

विराटने अनुष्काला हॉट फोटोशूटवरून खडसावलं

अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांनाही आपल्या दिलखेच अदांनी घायाळ केलंय. अनुष्काने आताचं एक फोटोशूट केलं, या फोटोशूटवरून विराटने अनुष्काला चांगलंय खडसावलं असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Dec 21, 2014, 10:41 PM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली

सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Dec 15, 2014, 12:35 PM IST

'कर्णधारपद विराट कोहलीकडेच द्या'

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीकडेच कर्णधारपद देण्यात यावं अशी मागणी होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

Dec 14, 2014, 06:57 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया : विराटची कॅप्टन इनिंग अपयशी

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतला ४८ रन्सनं हरवलंय. 

Dec 13, 2014, 01:24 PM IST

अॅडलेड टेस्टमध्ये कोहलीनं रचला इतिहास!

अॅडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधलं सातवं शतक ठोकलंय. कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचलाय.

Dec 13, 2014, 11:49 AM IST

सचिन, धोनी, गांगुली, द्रविडला नाही जमले, ते विराटने करून दाखवले

 भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, द वॉल राहुल द्रविड, प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली यांना जमलं नाही, ते भारताचा मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीने करून दाखवले आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी खेळताना त्याने पहिल्या डावात शतक झळकविण्याची कामगिरी केली आहे. 

Dec 11, 2014, 05:12 PM IST

बाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.

Dec 11, 2014, 08:42 AM IST

एरॉनचा चौकार, टीम इंडियाने सीए इलेवनला २४३वर गुंडाळले

 जलद गोलंदाज वरूण एरॉनच्या चार विकेटच्या मदतीने भारताने दोन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया इलेवनला २४३ धावांवर गुंडाळले. फिल ह्युजेसच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर आज दोन्ही संघ मैदानात उतरले. 

Dec 4, 2014, 08:12 PM IST

ह्यूजसाठी राजीव शुक्लांच्या ट्वीटनं केला ‘अर्थाचा अनर्थ’

सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म बनलाय जिथं आपली एक चूक खूप महागात पडते आणि क्षणार्धात वायरल होते. असंच काहीसं घडलंय माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यासोबत. त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्यूजला अखेरचा अलविदा करत ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली. मात्र ट्वीटमध्ये खूप मोठी चूक केली. 

Dec 4, 2014, 11:33 AM IST

फिल ह्युजला अखेरचा निरोप, क्लार्कनं दिला खांदा

क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागून मृत्यू झालेला ऑसी क्रिकेटपटू फिल ह्युजेसवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मॅक्सव्हिल या त्याच्या जन्मगावी ह्युजेसवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Dec 3, 2014, 08:25 AM IST