'हिरव्या विषा'चा पर्दाफाश, डोंबिवलीत ठेकेदारविरोधात गुन्हा
डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी विषारी भाज्यांचं शेत उधळलं. डोंबिवली पोलिसांत ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. झी मीडियानं मुंबईतल्या 'हिरव्या विषा'चा पर्दाफाश केलाय.
Jul 11, 2015, 05:17 PM ISTरमजानचे भोजन घेतल्यानंतर इसिसचे ४५ दहशतवादी मृत्यूमुखी
रमजान निमित्ताने सांयकाळी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, अन्नातून विषबाधा झाल्याने इसिसचे ४५ दहशतवादी मृत्यूमुखी पडलेत. मोसूल, सीरिया येथे ही घटना घडली. भोजनासाठी १४५ दहशतवाद्यांना बोलविण्यात आले होते.
Jul 9, 2015, 05:34 PM ISTस्वच्छता अभियान सुरु केले तेच विष पसरवत आहेत - राहुल गांधी
ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तेच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहेत, थेट हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत निशाणा साधलाय.
Nov 13, 2014, 04:51 PM ISTसोनिया आणि राहुल गांधींची मोदींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 04:23 PM ISTहुंड्यासाठी सासरच्यांनी महिलेला विष देऊन मारले
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बुआरा गावात हुंड्यासाठी सासरच्या माणसांनी विवाहितेला विष पाजून मारले. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Aug 6, 2014, 02:51 PM IST१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले
संगणक शिकवणी आटोपून घरी जाणा-या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात विष पाजल्याची घटना घडली. चंद्रपुरातील ही घटना आहे. या विद्यार्थिनीवर पाळत ठेऊन या युवकाने हे कृत्य केलंय.
Jun 1, 2014, 09:08 PM ISTजहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री
सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको... या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास... परंतु पाटण्यामध्ये या जहरी सापांचं विष अगदी दिवसाढवळ्या विकलंय जातंय... नशेसाठी या विषाचा सर्रास वापर होतोय... पण पोलिसांना त्याची साधी खबरही नाही... झी मिडियानं छुप्या कॅमेरातून केलेलं हे स्टिंग ऑपरेशन...
Feb 21, 2014, 10:39 PM IST‘पोलोनियम’ देवून केली गेली अराफात यांची हत्या
२००४मध्ये पॅलेस्टाईन नेते यासिर अराफत यांची ‘पोलोनियम’ विष देवून हत्या केली गेली होती, असा गौप्यस्फोट अराफात यांच्या पत्नी सुहा अराफात यांनी आज पॅरिसमध्ये केलाय.
Nov 7, 2013, 11:28 AM ISTबेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!
हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
Jul 30, 2013, 03:57 PM ISTओबामांना आलं विषारी पत्र!
अमेरिकेतलं बोस्टन बॉम्बस्फोटानं हादरलं असताना आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रामध्ये रिसिन हा विषारी पदार्थ सापडलाय.
Apr 17, 2013, 11:45 PM ISTआंबा की विष ?
गोड आंबा का बनलाय विषारी ? रसाळ आंब्यावर कुणाची पडलीय वक्रदृष्टी ? आंब्यामुळे का मिळतंय गंभीर आजारांना निमंत्रण ? बाजारात आला फळांचा राजा! सर्वत्र होतेय आंब्याची विक्री !
Apr 17, 2013, 11:23 PM ISTसुगंधी दूध की विष?
मुंबई महापालिकेचं सुंगधी दूध पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यांत सापडलयं. मालवणी महापालिका शाळेत ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं सुंगधी दूध बंद करण्यात आलंय. यापूर्वीही काही शाळांमध्ये असा विषबाधेचा प्रकार घडला होता. पालिका शिक्षक सभेनं या सर्व प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केलीये.
Oct 13, 2012, 05:59 PM ISTलतादीदींवर झाला होता विषप्रयोग!
तब्बल सहा दशके ५० हजारांहून अधिक गाणी आपल्या जादुई स्वरात गाऊन जागतिक विक्रम करणार्या् गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यावर पन्नास वर्षांपूर्वी ‘विषप्रयोग’ झाला होता. त्याचा खळबळजनक गौप्यस्फोट प्रख्यात डोगरा कवयित्री पद्मा सचदेव यांच्या ‘ऐसा कहां से लाऊ’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल एक खळबळजनक घटना लिहिली आहे आणि ही घटना खुद्द लतादीदींनीच आपल्याला सांगितल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
Sep 29, 2012, 04:04 PM IST