शेतकरी संप

शिवसेनेने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.

Jun 8, 2017, 12:35 PM IST

शेतकरी आंदोलन : बंदच्या काळात लूट-जाळपोळ, रस्ता-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झालेत. बंदच्या काळात लुटीच्या घटनांत वाढ झालेय. तसेच आंदोलनामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.

Jun 8, 2017, 10:07 AM IST

शेतकरी संप मागे : कृषी उत्पन्न बाजार समितींतील परिस्थिती पूर्वपदावर

शेतकरी संपामुळे ठप्प असललेल्या राज्य भरातल्या बाजार समित्या आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत.  आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ५२५ गाड्यांची आवक झालीय. 

Jun 8, 2017, 08:33 AM IST

शेतकरी कर्जमुक्ती : भाजप-शिवसेनेत तणाव वाढला

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून आज युतीतला तणाव वाढला आहे. आज शिवसेनेनं आज कॅबिनेटच्या बैठकीत गैरहजेरी नोंद केली. दरम्यान, शिवसेना मंत्र्यांनी रितसर परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Jun 7, 2017, 01:01 PM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांचा बहिष्कार, शेतकरी संपाला पाठिंबा

राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.

Jun 7, 2017, 12:29 PM IST