शेतकरी

व्यापारी उद्यापासून करणार शेतकऱ्यांची गळचेपी

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत घेतली जावी या निर्णयाला नाशकातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आडत्याच्या कात्रीतून बळीराजाची सुटका करण्याचा प्रयत्न पणन संचालक सुभाष माने यांनी केला आहे, हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या निर्णयावर नाशकातले व्यापारी संतापले आहेत.

Dec 21, 2014, 06:52 PM IST

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे

जयवंत पाटील, झी 24 तास, मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.

Dec 16, 2014, 09:45 PM IST

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आज मिळणार दिलासा

आज मुख्यमंत्री गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं १० सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झालंय.  

Dec 15, 2014, 11:38 AM IST

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Dec 13, 2014, 06:02 PM IST

मुंबईतही 'डिसेंबर'चा पाऊस; पुढच्या ४८ तासांत पावसाची शक्यता कायम

मुंबई, पुणे, नाशिक या तीनही शहरांना ऐन डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईत पुढचे दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.

Dec 13, 2014, 08:23 AM IST