नागपूर: आज मुख्यमंत्री गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं १० सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झालंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गारपिटग्रस्त नाशिक परिसराचा दौरा केला होता. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तळेगावला मुख्यमंत्र्यांनी भेट दिलीय. हिवाळी अधिवेशन सुरु असल्यानं काही निर्णय घेता येत नाही.
मात्र परिस्थिती पाहता काही दीर्घकालीन निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली.
तर केंद्राची दोन पथकं २ वेगवेगळ्या टीम बनवून आज सकाळी साडे आठ वाजेपासून दुष्काळाची पाहणी सुरू केलीय. ही दोन्ही पथके १५, १६ आणि १७ डिसेंबर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून आपला अहवाल केंद्रात सादर करणार आहेत.
दरम्यान, शेतीच्या नुकसान भरपाई बाबत नवीन कायदा करण्यात येणार असून, ब्रिटिशकालीन आणेवारी पद्धत बंद करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.