संघर्षाला हवी साथ

संघर्षाला हवी साथ : कौतुक सोहळा, २० जुलै २०१७

कौतुक सोहळा, २० जुलै २०१७

Jul 20, 2017, 03:03 PM IST

संघर्षाला हवी साथ : पास झाल्यानंतर पेढे वाटायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते!

लहानपणीच त्याच्या आई वडिलांचं निधन झालं... एकट्या आजीनं कसंबसं त्याला सांभाळलं... आजीकडून होईना म्हणून तो स्वतःच पाचवीपासून किराणा दुकानात काम करायला लागला... एवढं सगळं सोसूनही त्यानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२.२० टक्के मिळवलेत... ही गोष्ट आहे सटाण्याच्या सचिन देवरेची...

Jul 13, 2017, 08:42 PM IST

संघर्षाला हवी साथ : त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!

त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!

Jul 8, 2017, 09:16 PM IST

संघर्षाला हवी साथ : त्यानं आईच्या कष्टाचं चीज केलं!

वयाच्या पाचव्या वर्षीच दत्ता वाघिरे या हुशार विद्यार्थ्याच्या वडिलांचं निधन झालं... त्यानंतर दत्ताची आई दुसऱ्याच्या शेतात राबून तीन मुलांचं शिक्षण पूर्ण करतेय. दहावीच्या परीक्षेत दत्तानं तब्बल ९७ टक्के मिळवलेत.... त्याच्या कष्टांना तुमची साथ हवीय...

Jul 8, 2017, 08:58 PM IST

संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

एका कोकणकन्येचा संघर्ष!  

Jul 7, 2017, 09:25 PM IST

संघर्षाला हवी साथ : एका कोकणकन्येचा संघर्ष!

दहावीच्या परीक्षेत यंदाही कोकण अव्वल ठरलं. आज संघर्षाला हवी साथमध्ये एका कोकणकन्येचा संघर्ष... दापोलीतल्या जागृती जयेंद्र मंडपेला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के मिळवलेत... कुणाचाही खंबीर पाठिंबा नसताना जागृतीनं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.

Jul 7, 2017, 07:32 PM IST

संघर्षाला हवी साथ : बोलक्या मुलीची ही कहाणी!

शिक्षणाचा आणि तिच्या कुटुंबीयांचा जराही संबंध नाही... धुळ्याच्या योगिता पाटीलनं ज्या परिस्थितीतून यश मिळवलंय, त्याची कल्पना करणंही कठीण... तरीही योगितानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९१ टक्के मिळवले... जिद्दी योगिताची ही गोष्ट पाहा.... आणि तिला सढळ हस्ते मदत करायलाही नक्की पुढे या!

Jul 6, 2017, 10:43 PM IST

संघर्षाला हवी साथ : शेतमुजरी करत, घर सांभाळत तिनं मिळवलं यश!

शेतमुजरी करत, घर सांभाळत तिनं मिळवलं यश!  

Jul 6, 2017, 09:32 PM IST

संघर्षाला हवी साथ : शेतीत काम करत त्यानं मिळवलं यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सांगलीच्या तुषार कुंडलिक जावीर या विद्यार्थ्यानं दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तुषारला शेतात काम करावं लागतं... पुढच्या शिक्षणासाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...

Jul 5, 2017, 11:23 PM IST