2014 15

मोदी सरकारचं महाराष्ट्राला 'रिटर्न गिफ्ट'... पुण्याला लॉटरी!

महाराष्ट्रात मोदी सरकारला मिळालेल्या या यशाला ध्यानात ठेऊन अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही महत्त्वाच्या तरतूदी करत सरकारनं राज्याला एक प्रकारे 'रिटर्न गिफ्ट'च दिलंय.

Jul 10, 2014, 02:14 PM IST

इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये ५० हजारांची वाढ

अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे. 

Jul 10, 2014, 12:58 PM IST

तयार राहा; आर्थिक सर्वेक्षणातून कठोर निर्णयांचे संकेत

मोदी सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये सारं काही आलबेल असणार नाही. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून तरी हेच संकेत मिळतायत. महागाई तर कायम राहिलच, पण त्याचबरोबर डिझेल आणि एलपीजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Jul 10, 2014, 08:37 AM IST

बजेट 2014-15 : 'अच्छे दिन'साठी मोदींची कसरत

खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे पहिल्यांदाच मोदी सरकारचं बजेट मांडणार आहेत. 

Jul 10, 2014, 08:10 AM IST

मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

Jun 23, 2014, 08:51 PM IST

प्रमुख मुद्दे : `अर्थसंकल्प २०१४-१५`

विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०१४-१५ सादर केला.

Feb 25, 2014, 02:22 PM IST