कसाबच्या कोठडीत संजय दत्त गुदमरला!
सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या संजय दत्त याने आपल्याला दुसऱ्या अंडा सेलमध्ये हलवण्याची मागणी वकिलामार्फत केली होती. या आधी त्याला अजमल कसाबचं वास्तव्य असणाऱ्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
May 20, 2013, 03:54 PM IST‘कसाब’च्या जागेवर संजय दत्त!
संजय दत्तला आर्थर रोडच्या १२ नंबरच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलंय. याअगोदर या सेलमध्ये २६/११च्या हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाब याला ठेवण्यात आलं होतं.
May 17, 2013, 09:10 PM ISTअबू जुंदालला दिसतंय कसाबचं भूत!
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार अबु जुंदाल याने आपल्याला अजमल कसाब दिसत असल्याचं सांगितल्यामुळे अबु जुंदालच्या वैद्यकीय तपासण्या करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने ऑर्थर रोड जेलला दिले आहेत.
Mar 6, 2013, 04:17 PM ISTकसाबच्या दफनविधीसाठी झाला सर्वात कमी खर्च...
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्या अटकेपासून ते फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीपर्यंत केंद्र सरकारनं २८.४६ करोड रुपयांचा खर्च केलाय.
Dec 7, 2012, 11:48 AM IST`कसाबची फाशी आणि सरबजीतच्या सुटकेचा संबंध नाही`
पाकिस्तान अजमल कसाबची फाशी आणि सरबजीत हे दोन मुद्दे वेगवेगळेच ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पाकिस्तानचे सुरक्षा मंत्री रहेमान मलिक यांनी दिलीय.
Nov 23, 2012, 07:03 PM IST`कसाबचं शव परत करा, अन्यथा...`
अजमल कसाब याच्या फाशीचा बदला म्हणून भारतात हल्ले करण्यात येईल, अशी धमकीच पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना ‘पाक तालिबान’नं दिलीय.
Nov 22, 2012, 04:28 PM ISTकसाब फाशी : फेसबुकवर पडलेले प्रश्न
अजमल कसाब याल पुण्यात फाशी देण्यात आल्यानंतर सोशल नेटवर्किंला चालना मिळाली. मंदावलेल्या गतीने वेग घेतला आणि कसाबच्या फाशीचे स्वागत केले. कोणी फोटो टाकलेत. तर कोणी शहीदांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे पोस्ट केले. मात्र, या घडामोडीत मजेशीरबाबही पुढे आली ती म्हणजे नेटीझन्सना पडलेले प्रश्न.
Nov 22, 2012, 04:20 PM ISTदहशतवादी अफजल गुरूच्या फाशीची मागणी
कसाबच्या फाशीनंतर आता संसदेवरील हल्ल्याप्रकरणी गुन्हेगार असलेल्या अफजल गुरूच्याही फाशीची मागणी पुढं आली आहे. भाजपनं अफजल गुरूला फाशी कशी देणार, असा सवाल सरकारला केला आहे.
Nov 22, 2012, 08:40 AM ISTकसाब : फासावर चढणारा पहिला विदेशी
भारताच्या इतिहासात फासावर चढणारा पहिला विदेशी नागरिक अजमल कसाब ठरला आहे. कसाबने मुंबईत दहशतवादी हल्ला करून कित्येक निरअपराध लोकांचे बळी घेतले होते. त्याला पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आले.
Nov 21, 2012, 07:55 PM ISTअशी दिली असावी कसाबला फाशी
२६ / ११चा दहशतवादी कसाबला आज सकाळी साडे सातच्या सुमारास फाशी देण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला.
Nov 21, 2012, 02:18 PM ISTमाझ्या पतीला खरी श्रद्धांजली – स्मिता साळसकर
२६/११ या मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्याने खऱ्या ए अर्थाने न्याय मिळाला आहे. हिच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे, असे शहीद झालेले पोलीस अधिकारी विजय साळसकर यांची पत्नी स्मिता साळसकर यांनी सांगितले.
Nov 21, 2012, 01:51 PM ISTकसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. या प्रकरणी तुम्हांला काय वाटते आम्हांला सांगा आम्ही त्याला देऊ प्रसिद्धी....
Nov 21, 2012, 12:02 PM ISTकसाबला फाशी : पाकिस्तानी मीडियानं भूमिका घेणं टाळलं
भारतात उघडउघडपणे कसाबच्या फासावर जाण्याच्या बातमीवर आनंद व्यक्त केला जातोय तिथं पाकिस्तानी मीडियानं मात्र कोणतीही भूमिका घेण्याचं सपशेल टाळलंय.
Nov 21, 2012, 11:53 AM IST...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्याला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते. कसाबला ७.३० वाजता फाशी देण्यात आल्यानंतर ७.४५ वाजता गृहमंत्र्यालया फोन आला, ‘मिशन एक्स’ कंप्लीट.
Nov 21, 2012, 11:11 AM IST`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`
कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचं काय? असा सवाल केंद्र सरकारला केलाय.
Nov 21, 2012, 10:55 AM IST