barsu refinery

बारसू रिफायनरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी

Raju Shetty Ban Ratnagiri : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. सध्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. येथील आंदोलन पेटले आहे. त्यामुळे शेट्टी यांना रत्नागिरी बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे.

May 2, 2023, 09:39 AM IST

शहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी

बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.

Apr 28, 2023, 09:41 PM IST

A to Z समजून घ्या बारसू रिफायनरी वाद; कोकणकरांनो पाहा पटतंय का...

Barsu Refinery : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात जमिनीच्या सर्वेक्षणावरून सध्या जोरदार गदारोळ सुरु झाला आहे. पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या जमीन सर्वेक्षणावरुन राज्यात मोठं राजकारण पेटलं आहे.

Apr 28, 2023, 05:21 PM IST

Barsu Refinery : बारसू आंदोलन तीन दिवस स्थगित, आंदोलकांची मोठी घोषणा, पाहा Live Video

बारसूतल्या रिफायनरीसाठी शेतक-यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. विरोध करणा-यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

Apr 28, 2023, 04:55 PM IST

रिफायनरी विरोधातील आंदोलन आक्रमक भूमिकेत, सर्वेक्षण ठिकाणी विरोधकांची कुच, पाहा Live Video

बारसूत रिफायनरीला विरोध असलेल्या आंदोलकांची पोलिसांशी झटापट....पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी...आंदोलकांचा आरोप...तर कुठलाही अन्याय, अत्याचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Apr 28, 2023, 04:11 PM IST

'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर

जोडे पुसण्याची लायकी असलेले राज्यकर्ते बनल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 

Apr 27, 2023, 06:38 PM IST

बारसू रिफायनरीला होणारा राजकीय विरोध मावळतोय? उद्धव ठाकरे, अजित पवारांची सावध भूमिका

रिफायनरीचा प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या-काठ्या कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे आहे. तर विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही मात्र पर्यावरणाचा ऱ्हास नको अशी सावध भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

Apr 27, 2023, 04:20 PM IST

उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरीसाठी PM मोदींना पत्र लिहिल्याची दिली कबुली; म्हणाले "हो मीच..."

Uddhav Thackeray on Barsu Refinery: बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) सध्या वाद पेटलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिल्याता दाखला सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिल्याची कबुली दिली आहे. 

 

Apr 27, 2023, 01:42 PM IST

"जोडे पुसायची लायकी असणारे..."; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले "मी सूड घेणार"

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवत आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच बारसू रिफायनरीवरही (Barsu Refinery) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 27, 2023, 01:26 PM IST
Thackeray Faction Rajan Salvi on Barsu Refinery PT1M9S