महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Feb 23, 2017, 09:55 PM IST...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
Feb 23, 2017, 09:05 PM IST...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे
मुंबईत झालेला दारुण पराभव हा काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेसच्या उमेदवारांचा नाही तर हा पराभव आहे संजय निरुपम यांचा... अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पराभवाचं खापर पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर फोडलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते.
Feb 23, 2017, 08:12 PM ISTमुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला 'सात' दिली!
'तुमच्या राजाला साथ द्या' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली खरी... पण, मनसेच्या आत्तापर्यंतच्या विविध धोरणांमुळे थोडा घोळच झाला... मुंबईकरांनी 'राजा'च्या हाकेला साद देत 'साथ' दिली ती केवळ 'सात' जागांवर...
Feb 23, 2017, 07:49 PM ISTसत्ता-संपत्ती-साधनांना हरवत शिवसेनेचा विजय : उद्धव ठाकरे
महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये टक्कर झाली. शिवसेनेने भाजपला विजयानंतरही टोकले आहे. सत्ता, संपत्ती, साधनांच्या जोरावर ताकद लावली गेली. मात्र, शिवसेनेला कोणीही रोखून शकत नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला.
Feb 23, 2017, 07:43 PM IST220 मध्ये चिठ्ठीने शिवसेनेला दिला दणका, भाजपात जल्लोष
पालिका निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. अखेर चिठ्ठी टाकण्यात आली. यात भाजपची सरसी झाली.
Feb 23, 2017, 06:58 PM ISTमुंबईत चिठ्ठी टाकून लागणार निर्णय.... पाहा कोणाचं लक फळफळणार
मुंबईच्या निवडणुकीत सर्वात चुरशीची आणि उत्कंठा वाढविणारी लढत ठरली आहे वॉर्ड क्रमांक २२० ची. यात भाजपचे अतुल शहा आणि सुरेंद्र बागल यांना समसमान मते पडली. त्यामुळे येथे फेरमोजणी झाली. यावेळीही समान मते असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चिठ्ठीवर भवितव्य ठरविण्यात येणार आहे.
Feb 23, 2017, 06:37 PM ISTभाजपला ८५ नगरसेवकांचं पाठबळ, आशिष शेलार यांचा दावा
मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या जवळजवळ समान जागा आल्यामुळं सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झालाय.
Feb 23, 2017, 06:35 PM ISTशिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत
पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल आहे. शिवसेनेने प्रथम स्थान आबाधित राखताना भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे अवघड झाले आहे. शिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत निवडणून गेलेत.
Feb 23, 2017, 05:48 PM ISTमुंबईत शिवसेना - भाजप उमेदवारांना समसमान मते, फेर मतमोजणी
मुंबई पालिका निवडणुकीत प्रभाग 220मध्ये 'टाय' झाली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे लक्ष लागले आहे.
Feb 23, 2017, 02:10 PM ISTLIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल
राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.
Feb 23, 2017, 09:00 AM ISTटेन्शन वाढलं! रणसंग्रामात कोण मारणार बाजी?
मुंबई महापालिकेसह दहा महापालिका आणि 25 जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांवर कोणाचं वर्चस्व रहाणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
Feb 23, 2017, 07:07 AM ISTदहा महापालिकांसाठी झी २४ तासचे अंदाज
राज्यातील 10 प्रमुख शहरातील महापालिकेत नेमकी कुणाची सत्ता येईल, याविषयी जनतेच्या मनात कुतूहल आहे. यावर 'झी २४ तास'ने देखील अंदाज बांधला आहे. हा एक प्राथमिक अंदाज आहे. तर खालील शहरात कोणत्या पक्षाचे आकडे जवळपास जातील याचा अंदाज 'झी २४ तास'चा आहे.
Feb 22, 2017, 08:30 PM ISTशिवसेनेचा अंदाज मिळणार ११० जागा
मुंबईत कोणाला किती जागा मिळणार यावर सर्व जण आज काल तज्ज्ञासारखे अंदाज वर्तवत आहेत. आता सोशल मीडियावर शिवसेनेचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अंदाज फिरत आहे. हा शिवसेना अंदाज आहे का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Feb 22, 2017, 07:53 PM IST