breaking news

ashish shelar criticize to Thackeray and shivsena PT1M4S

Video| आशिष शेलारांकडून शिवसेनेचा उल्लेख पेंग्विन सेना...

ashish shelar criticize to Thackeray and shivsena
आशिष शेलारांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे. शेलारांनी शिवसेनेचा पुन्हा एकदा पेंग्विन सेना असा उल्लेख केला आहे. पब, पेग, पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातं असं ध्वनिप्रदूषण करण्याची नशा चढलीय असं ट्वीट त्यांनी केलंय.

Sep 4, 2022, 01:30 PM IST

Mahindra Car : महिंद्रा बोलेरोमध्ये मोठा बदल, आता दिसते अशी, पाहा फोटो

भारतात कार मॉडिफिकेशनची (car modification) वेगळी क्रेझ आहे. काही लोक आपली वाहने हौशी पद्धतीने बदलतात, तर काहीजण त्यात आवश्यक ते बदल (Changes) करतात.

Sep 4, 2022, 12:57 PM IST

खिशात पैसे टिकत नाहीत? मग 'हा' खात्रीशीर उपाय करा!

Astro Remedies for oney : पैशाची कमतरता हे जीवनातील अनेक समस्यांचे मूळ  आहे. यावर मात करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात सांगितलेले काही उपाय केले तर धनाचा ओघ वेगाने वाढतो. 

Sep 4, 2022, 12:36 PM IST
The issue of police houses will be resolved PT48S

Video | पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार! शिंदे सरकारकडून हालचालींना सुरुवात

The issue of police houses will be resolved
पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.. राज्यात सध्या पोलिसांची संख्या 2 लाख 43 हजार असून साधारणत: ७० टक्के पोलिसांना घरे देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी ८२ हजार घरांची आवश्यकता आहे. म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास योजनांमध्ये पोलिसांसाठी तब्बल २५ टक्के घरे आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा लवकरच अंतिम केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळ आणि शहर परिवहन उपक्रमांच्या आगार आणि बस स्थानकांचा विकास करून त्यातूनही पोलिसांसाठी काही प्रमाणात घरे निर्माण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sep 4, 2022, 12:20 PM IST
Heavy Rainfall in beed PT1M47S

Video| बीडमध्ये मुसळधार पाऊस! झाडं उपडली उन्मळून

Heavy Rainfall in beed
- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस,
- आष्टी तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्याचा फटका
- जोराचा वारा असल्याने अनेक गावातील मोठमोठाले झाडे उघडून पडली
- वादळामुळे मोठं मोठी झाड़ मुळासकट उपटून पडली
- झाडे विद्युत तारेवर घरावर पडल्यामुळे मोठं नुकसान
- अनेक वाडी वस्त्यावरील वीज गायब

Sep 4, 2022, 12:10 PM IST
ordinance of marathi plates on shops only on paper PT43S

Video| महाराष्ट्रात दुकानांवरील पाट्या अद्यापही अमराठीच...

ordinance of marathi plates on shops only on paper
दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा अध्यादेश कागदावरच राहिलाया.. राज्य सरकारने अध्यादेश काढला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कामगार आयुक्तालयातील दुकान निरीक्षकांचे कारवाईचे अधिकार गोठवलेत. आणि त्यांना केवळ ‘जनजागृती’ करण्यास सांगण्यात आलंय... त्यामुळे मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणा-या मनसेनं याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारने अध्यादेशात सुधारणा करावी, अशी मागणी मनसेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

Sep 4, 2022, 12:00 PM IST
lampi dieases increased in state PT49S

Video| सावधान! राज्यावर आणखी एक संकट; लम्पी उठला जीवावर

lampi dieases increased in state
- राज्यात लम्पी विषाणूजन्य आजाराचा विळखा वाढला
- राज्यात लम्पी विषाणूमुळे 11 गायींचा मृत्यू
- 9 राज्यात आतापर्यंत सुमारे 50 हजार गायींचा बळी
- जळगाव, अकोला, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात लम्पींचा कहर

Sep 4, 2022, 11:45 AM IST

Ganesh Visarjan 2022 : अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? विसर्जनाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. 

Sep 4, 2022, 11:33 AM IST
Two leopard cubs finally got their mother PT49S

Video| दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर बिबट्याच्या बछड्यांना मिळाली आई...

Two leopard cubs finally got their mother
अमरावतीमध्ये आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना अखेर त्यांची आई भेटलीय. अमरावतीत वनविभागाच्या वनिकरणामध्ये हे दोन बछडे आढळून आले होते. वनविभागानं या बछड्यांचं रेस्कू करून त्यांना बांबू गार्डनमध्ये ठेवलं... त्यानंतर वनविभागानं त्यांच्या आईचा शोध सुरू केला. अखेर दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर या बछड्यांना त्यांची आई मिळवून देण्यात वनविभागाला यश आलं.

Sep 4, 2022, 11:30 AM IST
Bhaskar Jadhav said BJP wanted to create riots in the state PT1M3S

Video| भाजपला राज्यात दंगली घडवायच्या होत्या- भास्कर जाधव

Bhaskar Jadhav said BJP wanted to create riots in the state
राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न भाजपने केलं असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. गुहागरमधील सेना मेळाव्यात भास्कर जाधवांनी हा आरोप केला. राज्यात विविध विषय निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न भाजपने केला असा आरोप जाधवांनी केलाय.

Sep 4, 2022, 11:25 AM IST

Car Tyre : तुमच्या कारच्या टायरमध्ये 'ही' लक्षणे दिसताच टायर बदला, हे इंडिकेटर तुम्हाला करेल सावध…

अनेकांना गाडी चालवायला आवडते. पण गाडी चालवताना आपली कार मध्ये कुठेही थांबू नये याची खबरदारी घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कालांतराने, वाहनाचे अनेक भाग बदलणे आवश्यक आहे. कार टायर देखील त्यापैकी एक आहेत.

Sep 4, 2022, 11:02 AM IST
dog saved women life PT41S

Video | वळसे पाटील यांच्या घरी निघाला नाग! कुत्र्याने वाचवला मालकिणीचा जीव...

dog saved women life
पुण्यात पाळीव कुत्र्यानं मालकिणीचा जीव वाचवलाय. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्या निरगडसर इथल्या घरी ही घटना घडलीय. वळसे पाटील यांच्या घराच्या अंगणात भलामोठा नाग आला... या सापाला पाहून रामदास यांच्या पत्नी चंदा वळसे पाटील घाबरल्या आणि अंगणात पडल्या.. मात्र त्यांच्या कुत्र्यानं नागावर हल्ला करत त्याला मालकिणीपासून दूर ठेवलं.. आणि गेटबाहेर हुसकावून लावलं.. कुत्रा आणि नागाच्या संघर्षाचा हा व्हिडियो सीसीटीव्हीत चित्रीत झालाय.

Sep 4, 2022, 11:00 AM IST