breaking news

dharashiv farmers will get 510 crore crop Insurance PT43S

Video| धाराशीवमधील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, 510 कोटींचा खरिपाचा पीकविमा मिळणार

dharashiv farmers will get 510 crore crop Insurance
धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे...धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या संदर्भातील लढा अखेर यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील साडे तीन लाख शेतक-यांना खरीपातील 510 कोटींचा पीक विमा मिळणार आहे.. विमा कंपनीनं याबाबत दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीये.. या आधीही हायकोर्टानं शेत-यांच्या बाजूनं निकाल दिला होता.. मात्र त्याविरोधात कंपनीनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली.. सुप्रीम कोर्टानं तो निकाल कायम ठेवत विमा कंपनीची याचिका फेटाळली त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण ५१० कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे.

Sep 5, 2022, 01:45 PM IST

facebook यूजर्संना धक्का! आता यूजर्स हे काम करू शकणार नाहीत

फेसबुक आणि इतर टेक कंपन्या वेळोवेळी अनेक फीचर्स बंद करत असतात. मात्र यावेळी फेसबुक आपले एक फीचर देखील बंद करत आहे. यामुळे अनेक वापरकर्त्यांवर परिणाम होईल. फेसबुकचे हे फीचर पुढील महिन्यापासून बंद होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Sep 5, 2022, 01:20 PM IST
kolhapur doctor saved patient life PT1M6S

Video| डॉक्टरांसमोरच हृदय बंद पडलं! क्षणात डॉक्टरांनी बंद पडलेलं हृदय पुन्हा सुरु केलं; पाहा व्हिडीओ

kolhapur doctor saved patient life
देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय एका पेशंटला आलाय. नियमित तपासणीसाठी डॉक्टरांसमोर बसलेल्या आणि डॉक्टरांशी बोलत असताना पेशंटचं हृदय अचानक बंद पडलं. यावेळी डॉक्टरांनी या पेशंटवर तत्काळ उपचार करत त्याला जीवदान दिलं. कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. डॉ. अर्जुन आडनाईक यांनी या पेशंटला जीवदान दिलंय. डॉ. आडनाईक यांच्यासमोर एक पेशंट बसला होता. त्यांच्याशी बोलत असताना अचानक त्या पेशंटचं हृदय बंद पडलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय.

Sep 5, 2022, 01:10 PM IST
Amit Shah will plan the strategy for the Mumbai Municipal Corporation elections PT5M34S

Video| अमित शाह यांची मुंबई मनपावर नजर! अमित शाह आखणार रणनिती

Amit Shah will plan the strategy for the Mumbai Municipal Corporation elections
महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची आज अमित शाह यांच्यासोबत आज बैठक होणारेय. याठिकाणी अमित शाह त्यांना मार्गदर्शन करणारेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीचं स्थान आणि वेळेत बदल करण्यात आलाय. आधी फडणवीसांच्या सागर निवासस्थानी ही बैठक होणार होती. मात्र आता या बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलंय. आज संध्याकाळी 5 वाजता एअरपोर्ट सेरेमोनियल लॉजमध्ये बैठक होणारेय.

Sep 5, 2022, 12:45 PM IST
many people were injured after a carnival ride broke in mohali PT3M8S

Video| जत्रेत 50 फुट उंचावर तुटला पाळणा! अनेक जण गंभीर जखमी; पाहा व्हिडीओ

many people were injured after a carnival ride broke in mohali
मोहालीमधल्या दसरा मैदानात 50 फूट उंच ड्रॉप टॉवर राईड तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. त्यानंतर मोहालीत भरलेल्या जत्रेत मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी या राईडवर 30 जण होते. त्यातील सर्वच जण जखमी झालेत. 13 जण गंभीर झालेत. जखमींमध्ये अनेक मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरुयत. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरुय. मात्र आयोजकांवर अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय.

Sep 5, 2022, 12:20 PM IST
shivsena mp sanjay raut judicial custody till 19 september PT47S

Video | संजय राऊत यांचा मुक्काम तुरुंगातच; कोठडीत वाढ

shivsena mp sanjay raut judicial custody till 19 september
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढलाय. राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आलीय. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.

Sep 5, 2022, 12:15 PM IST
Amit Shah visited the lalbaugcha raja with Family  PT1M18S

Video| अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन

Amit Shah visited the lalbaugcha raja with Family मुंबई दौ-यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दौ-याची सुरूवात लालबागच्या राजाच्या दर्शनाने केली. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचं स्वागत केलं. तिथून शाह आपल्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं पूजन केलं, बाप्पाच्या चरणांवर डोकं ठेऊन अमित शाह यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. लालबागमधून अमित शाह आता बांद्र्याकडे रवाना झालेत. तिथे त्यांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचं दर्शन घेतलं. तिथून ते उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटी देणार आहेत. अमित शाहांच्या या दौ-यात मनसेसोबत युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. शिंदे गटासोबत जागावाटप, मनसेसोबत युतीची चाचपणी, ठाकरे गटाला धोबीपछाड घालण्याची रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबई मनपात 115 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई मनपासह मुंबई परिसरातल्या महापालिका तसंच राज्यातल्या इतर महापालिकांमध्येही भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपने केलाय. त्यासाठी अमित शाहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

Sep 5, 2022, 12:05 PM IST

IND Vs PAK: पाकिस्तानच्या विजयानंतर 'मारो मुझे मारो' फेम मोमिनचा आनंद गगनात मावेना, आता म्हणतोय...

Momin Saqib Video : पाकिस्तानी अभिनेता मोमीन साकिबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तान सामना जिंकल्यावर आनंदाने रडताना दिसत आहे. 

Sep 5, 2022, 11:44 AM IST

Petrol Diesel Price : दिलासा की, झटका? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज किती रुपयांची वाढ?

 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून क्रुडच्या किमतीत चढ-उतारांचा सुरू आहे. परिणामी सुमारे साडेतीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel) दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. 

Sep 5, 2022, 11:00 AM IST

Stock Market : घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 315 अंकांनी वधारला, तर निफ्टी 111 अंकांनी वधारला

 शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच तेजी असल्याचे दिसून आले. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 348 अंकांनी वधारत 59,151.47 अंकावर व्यवहार सुरू होता.

Sep 5, 2022, 10:46 AM IST

Gold- Silver च्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर

मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Sep 5, 2022, 10:03 AM IST

Uttar Pradesh: लखनऊमधील हजरतगंज येथील हॉटेलला आग; पाहा Video

लखनऊमधील हजरतगंज येथील एका हॉटेलला आग लागल्याची घटना घडली आहे . या घटनेनंतर हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

Sep 5, 2022, 09:22 AM IST

India vs Pakistan Asia Cup : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; 'या' पाच जणांमुळे भारताचा पराभव

  आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सध्या सामने सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव  स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने पहिल्या पराभवाचा बदला घेऊन टीम इंडियावर विजय मिळवला. पाच विकेट्सने पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला आहे. 

Sep 5, 2022, 08:49 AM IST

Gauri Ganpati Visarjan 2022 : आज गौरी-गणपती विसर्जन, जाणून घ्या मुहूर्त

आज गौरी-गणपती विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे.

Sep 5, 2022, 07:58 AM IST