budget session

'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा

संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.  

Feb 25, 2015, 12:17 PM IST

संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्यसभेतील विरोधी पक्षाची ताकद लक्षात घेता त्यांची मनधरणी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जातंय. 

Feb 22, 2015, 12:11 PM IST

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Jan 22, 2015, 12:47 PM IST

महागाईच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरत गोंधळ घातल्यानं लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावं लागलंय. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते. 

Jul 7, 2014, 05:38 PM IST

संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

Jul 7, 2014, 09:09 AM IST

दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. दुष्काळानं होरपळलेल्या जनतेचे, शेती करपून गेलेल्या शेतकऱ्यांसह अनेकांचे डोळे लागलेत ते याच अधिवेशनाकडे...

Mar 12, 2013, 05:08 PM IST

मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. दुष्काळ समस्या सोडविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सेनेने केला.

Mar 11, 2013, 01:38 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार

राज्याच्य़ा विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.

Mar 11, 2013, 09:25 AM IST

बजेट २०१३ : राजकीय धुरंधर सज्ज!

आजपासून संसदेत यंदाच्या बजेट सत्राला सुरुवात होतेय. भ्रष्टाचारासारख्या विषयांना घेऊन हंगामा करण्यासाठी विरोधी पक्ष सज्ज झालाय.

Feb 21, 2013, 10:20 AM IST

विधानसभा कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार

विधानसभेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या कारणावरुन विरोधी पक्ष सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्ष सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

Apr 3, 2012, 12:09 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. नुकत्याच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Mar 12, 2012, 09:16 AM IST