campa cola

मुंबईत आणखी एक कॅम्पाकोला

मुंबईतल्या ताडदेव भागात आणखी एक कॅम्पा कोला प्रकरण आकाराला येतंय. एफएसआय शिल्लक नसतानाही कायदा धाब्यावर बसवून एक बिल्डर पुनर्विकास प्रकल्प राबवत असल्याचा आरोप स्थानिक करताहेत. तर या प्रोजेक्टला बीएमसी आणि म्हाडा साथ देत असल्याचीही त्यांची तक्रार आहे.

Mar 11, 2015, 11:08 PM IST

कॅम्पाकोलात दुस-या दिवशीही पालिकेची कारवाई

 कॅम्पाकोलामध्ये दुस-या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरू आहे. काल वीजेची 55, पाण्याचे 3 तर गॅसचे 14 कनेक्शन तोडल्यानंतर आज उर्वरित घरांचे कनेक्शन तोडण्याचं काम सुरू आहे. 

Jun 24, 2014, 07:03 PM IST

कॅम्पाकोलावर कारवाई अटळ, कायदा मोडणार नाही-मुख्यमंत्री

कॅम्पाकोलासाठी कायदा मोडणार नाही, ठरल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Jun 22, 2014, 04:33 PM IST

कॅम्पाकोलावासियांवर कारवाई नको - नांदगांवकर

कॅम्पाकोलावासियांवर कारवाई करु नका, या मागणीसाठी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Jun 22, 2014, 04:21 PM IST

विरोधानंतर कॅम्पाकोलावरची कारवाई पालिकेने थांबविली

कॅम्पाकोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली खरी मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे अधिकाऱ्यांना नोटीस देऊन रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

Jun 20, 2014, 02:55 PM IST

कॅम्पा कोलागेटवर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना रोखले

कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई सुरुवात झाली. मात्र, मुंबई पालिका अधिकाऱ्यांना आरटीआय कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी गेटवरच रोखले. त्यामुळे येथे तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Jun 20, 2014, 12:51 PM IST

कॅम्पा कोलावर आज कारवाई , बॅरिकेडस लावण्यास सुरूवात

कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई होणार आहे. आज फक्त गँस आणि वीज तोडली जाणाराय. परंतु पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाहीय. विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाणाराय. कँम्पा कोला परिसरात पोलिसांनी बँरिकेडस लावण्यास सुरूवात केलाय.

Jun 20, 2014, 07:49 AM IST

`कॅम्पा कोला`चा चौथा बळी; कारवाई स्थगित!

`कॅम्पा कोला`वर मंगळवारी कारवाई होणार नाहीय. उद्याची कारवाई रद्द करण्यात आलीय. आता १९ जूननंतरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 16, 2014, 07:22 PM IST

‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!

‘कॅम्प कोला’ रहिवाशांना महापालिकेनं ४८८ कलमाअंतर्गत नोटीस बजावलीय. वारंवार नोटीस बजावूनही घराच्या चाव्या महापालिकेकडं सुपुर्त न केल्यामुळं ही नोटीस बजावण्यात आलीय.

Jun 14, 2014, 08:09 PM IST

`कॅम्पाकोला`तील अनधिकृत घरं रिकामी होतायत...

सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.

Jun 5, 2014, 09:42 AM IST

सुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोला वासियांची याचिका फेटाळली

कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.

Jun 3, 2014, 02:08 PM IST

'कॅम्पा कोला'चं इमोशनल रोलर-कोस्टर...

कोर्टाच्या निर्णयामुळे कॅम्पा कोलावासियांची निराशा झालीय. सरकार यावर काही तोडगा काढेल आणि आपल्याला राहतं घरं सोडून देशोधडीला लागावं लागणार नाही, या आशेवर कोर्टाच्या आदेशांमुळे पाणी फिरलंय.

Nov 19, 2013, 08:15 PM IST

अनधिकृत बिल्डिंगच्या रहिवाशांना मोठा दिलासा, कारवाईला स्थगिती

वरळीच्या ‘कॅम्पा कोला’च्या अनधिकृत बांधकामावर आज सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झालीय. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे.

Nov 13, 2013, 10:58 AM IST

कॅम्पाकोलावर हातोडा पडणार? काय होणार रहिवाशांचं?

कॅम्पाकोला बिल्डींग पाडण्यासाठी आता केवळ काही तास शिल्लक आहेत. या प्रकरणी हस्तक्षेपास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय. अॅडव्होकेट जनरल यांचं यासंदर्भातलं मत प्रतिकूल आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेपास नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळं कॅम्पाकोलाच्या आशा हळुहळू मावळत चालल्याचं चित्र आहे.

Nov 11, 2013, 10:19 PM IST

‘कॅम्पाकोला’लाची मुदत संपली... हातोडा पडणार!

अनधिकृतपणे ३५ मजले बांधल्यानंतर बिल्डिंग तोडण्याच्या कारवाईची टांगती तलवार असलेल्या वरळीतल्या कॅम्पा कोला कम्पाऊंडमधल्या सात बिल्डिंगमधले १४० रहिवासी केवळ चमत्काराच्या आशेवर आहेत.

Oct 1, 2013, 01:54 PM IST