विधान परिषदेसाठी कोण असतील काँग्रेस उमेदवार?
आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.
Jul 8, 2012, 12:37 PM IST‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’
मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.
Jun 12, 2012, 02:26 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतला MMRDAच्या कामाचा आढावा
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामं पूर्ण झाली नसल्याचं चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सुरु असलेल्या या नालेसफाई आणि इतर कामांवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर जबाबदारी ढकलत आहेत.
Jun 12, 2012, 11:48 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गर्भपात प्रकरण उघडकीस
संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
Jun 11, 2012, 08:46 AM ISTजिल्हाधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
बीड जिल्ह्यासह राज्यातल्या स्त्रीभ्रूण ह्त्या थांबाव्यात यासाठी राज्य सरकार कसोशीनं प्रयत्न करतंय. मात्र बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेला छेद देण्याचा जोरदार प्रयत्न चालवलाय.
Jun 7, 2012, 12:27 PM ISTमुख्यमंत्र्यांनी आणलं राष्ट्रवादीला अडचणीत
काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे पाटबंधारे विभागाचे सादरीकरण करणार होते, मात्र सादरीकरण नको तर श्वेतपत्रिकेचा मसुदाच मंत्रिमंडळासमोर आणा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला अडचणीत आणलंय.
Jun 7, 2012, 08:41 AM ISTयोजना काँग्रेस सरकारच्या, प्रसिद्धी उद्घाटनकर्त्यांना
राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.
Jun 2, 2012, 07:14 PM ISTमुख्यमंत्र्यांवर अजित पवारांची कुरघोडी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातल्या कुरघोडीचं राजकारण शिगेला पोहचलंय. त्याचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्येही यायला लागलाय. पिंपरीत प्रस्तावित International Convention and Exhibition Center वरुन दोन्ही पक्षांमध्ये सामना रंगलाय.
May 10, 2012, 10:00 PM ISTशरद पवार यांचा मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल
सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. आघाडी सरकार चालवणं ही एक कला आहे. आम्ही 1978 साली आघाडी सरकार चालवलं, पण कुरघोडी केली नाही. तसंच केंद्रात आम्ही सात आठ वर्षं एकत्र आहोत, पण एकमेकांवर कुरघोड्या केल्या नाहीत.
May 5, 2012, 07:09 PM ISTमुख्यमंत्री झुकले बिल्डर्स पुढे, दिले भूखंड भलतीकडे
पुणेकरांसाठी विविध सुविधांसाठी आरक्षित ठेवलेल्या जमिनींचं आरक्षण उठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बिल्डर लॉबीसमोर झुकून हा निर्णय घेतल्याचा आरोप पुणेकरांनी केलाय. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यात अनेक धक्कादायक बदल करण्यात आलेत.
May 4, 2012, 09:59 PM IST'महाराष्ट्र भूषण' डॉ. अनिल काकोडकर
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केलीये.
Apr 26, 2012, 04:07 PM ISTदुष्काळी भागात, सवलतींची बरसात
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आल्यावर दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.
Apr 6, 2012, 03:11 PM ISTमुख्यमंत्र्यांसमोर दुष्काळी भागातलं भयाण वास्तव
सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागातलं भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्यावेळी समोर आलं आहे. एकीकडे जनता पाण्यासाठी वणवण करत असताना अधिकारी मात्र बिअर बारमध्ये मौजमजा करत असल्याचा आरोप खुद्द वनमंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम यांनी केलाय.
Apr 6, 2012, 01:58 PM ISTहॅप्पी बर्थडे पृथ्वी 'बाबा' !
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे. ‘मिस्टर क्लीन’ अशा प्रतिमेमुळेच चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. सुमारे सव्वा वर्षांपासून आघाडीचं सरकार चालवताना त्यांची नक्कीच कसरत होत आहे.
Mar 17, 2012, 03:27 PM IST