cm eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले. फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत. शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती. 

Aug 5, 2023, 11:27 AM IST

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा

CM Eknath Shinde: कोरोना काळातील घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली. 

Aug 4, 2023, 06:35 PM IST

'मुख्यमंत्री' स्टीकर काढून नार्वेकरांनी अजित पवारांना CM च्या खुर्चीत बसवलं; Video चर्चेत

Ajit Pawar Seats On CM Chair: मुंबईमध्ये आज सकाळी 10 वाजता पार पडलेल्या भूमीपूजन सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर नव्हते. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये शिंदेंच्या नावान एक खुर्ची राखीव ठेवण्यात आलेली.

Aug 3, 2023, 11:38 AM IST

'12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा'; हायकोर्टाने सरकारचे टोचले कान

Maharashtra News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं प्रकरण मागच्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे. हायकोर्टाने 10 दिवसांत सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.

Jul 31, 2023, 02:21 PM IST

आमदारांच्या विकास निधी वाटपात अन्याय, न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा इशारा

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतंच आमदारांना विकास निधीचं वाटप केलं. यात शिंदे गट, शरद पवार गटाच्या आमदारांना निधीचा वर्षाव केला. तर भाजपाच्या प्रशांत बंब यांच्या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. पण दुसरीकडे सर्वात कमी निधी मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

Jul 26, 2023, 07:54 PM IST

'असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?', बांडगुळं म्हणत उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षाचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना' (Saamana) वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, यामधून त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे ट्रिपल इंजिन की डालडय़ाचा डबा? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

 

Jul 26, 2023, 07:42 AM IST

प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरार रंगाणार! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार

राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. या निर्णय मंजुर झाल्यास दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाईल.

Jul 25, 2023, 03:06 PM IST

33 वर्षांच्या राजकारणात अजित पवार पहिल्यांदाच संघ मुख्यालयात; मदनदास देवी यांचे घेतले अंत्यदर्शन

Ajit Pawar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सोबत होते.

Jul 25, 2023, 03:06 PM IST

'मनातले मुख्यमंत्री' पोस्टरवर भडकले अजित पवार; आमदारांना दिला इशारा

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होते. अशातच राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले होते. त्यावरुन आता अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jul 24, 2023, 03:46 PM IST

सहकुटुंब भेटीनंतर मोदींनी मराठीत केलं CM शिंदेंचं कौतुक! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी...'

PM Modi Praises Maharashtra CM Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट घेतली. या भेटीची माहिती एकनाथ शिंदेंनीच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. याच भेटीवर आता मोदींनी थेट मराठीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2023, 04:01 PM IST

दोन वर्षांपासून तळीयेतील गावकरी कंटेनरमध्येच; घरांचे बांधकाम अद्यापही अपूर्णच

Taliye Landslide : इरसालवाडीतील दुर्घटनेनं 2021 साली झालेल्या तळिये दरड घटनेची आठवण करुन दिली आहे. दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र या दरडग्रस्तांची आजही परवड सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्षे तळियेतील गावकऱ्यांवर ऊन, वारा पाऊस झेलत कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे.

Jul 22, 2023, 11:49 AM IST

इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं

रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.

Jul 21, 2023, 10:08 PM IST