congress

Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet :  भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

Apr 14, 2023, 10:15 AM IST

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?

Apr 13, 2023, 03:27 PM IST

"... तर मी विरोध करणारच", बाजार समितीवरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी

Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. अजित पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Apr 12, 2023, 03:34 PM IST

राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. 

Apr 12, 2023, 03:27 PM IST

"टाळी एका हाताने वाजत नाही, या गोष्टी बंद करा," अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले

Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

 

Apr 12, 2023, 02:16 PM IST

विधिमंडळ शिष्टमंडळ जपानच्या अभ्यास दौऱ्यावर, ठाकरे गटाच्या आमदारांचा उल्लेख शिवसेना यादीत

Legislature delegation on study tour to Japan : विधीमंडळाचे 21 सदस्यांचं शिष्टमंडळ जपानला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दौऱ्यावर जाणारे सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत.  

Apr 11, 2023, 09:03 AM IST

National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?

National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.

Apr 10, 2023, 09:12 PM IST

Maharashtra Politics : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी; पुण्याच्या अत्यंत महत्वाच्या जागेवरुन वाद पेटणार

Maharashtra Politics : पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. 

Apr 10, 2023, 05:06 PM IST

शरद पवारांना 'लोभी' म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या "जे काही म्हणाले..."

Alka Lamba on Sharad Pawar: अदानी प्रकरणावरुन (Adani) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांना लोभी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका (Alka Lamba) लांबा आता बॅकफूटवर जाताना दिसत आहे. अलका लांबी यांनी आपलं ट्विट हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Apr 9, 2023, 12:47 PM IST

"घाणेरडे राजकारण..." शरद पवार यांच्यावर टीका केल्याने देवेंद्र फडणवीस संतापले

Maharashtra Politics : गौतम अदाणी प्रकरणात जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. यावरुनच काँग्रेस नेत्याने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे

Apr 9, 2023, 10:25 AM IST

शरद पवार म्हणतात JPC नको, काँग्रेस म्हणालं "तुमचं मत काहीही...; अदानी प्रकरणावरुन महाविकास आघाडीत फूट?

Congress on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी जेपीसीऐवजी (JPC) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी असं मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता काँग्रेसने याप्रकरणी हरकत घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Apr 8, 2023, 06:59 PM IST

Rahul Gandhi : "राहुल गांधींना शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू"; काँग्रेस नेत्याची धमकी

Rahul Gandhi : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यानंतर  शिक्षेविरोधात राहुल गांधींनी आज सूरत कोर्टात अर्ज दाखल केला. कोर्टाने राहुल यांना जामीन मंजूर करताना सध्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला आहे

Apr 8, 2023, 04:19 PM IST

नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख

Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.

Apr 8, 2023, 12:57 PM IST