धुळे, नंदुरबारचा विकास का नाही, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. गुजरातचा विकास होतो मात्र जवळच्या धुळे, नंदुरबारचा का नाही, असा सवाल नरेंद्र मोदींनी केलाय.
Apr 22, 2014, 01:38 PM ISTउत्तरभारतीयांना पुन्हा मारीन - राज ठाकरे
उत्तर भारतीय माझ्या मराठी मुलांच्या तोंडातील घास हिसकवून घेत असतील तर पुन्हा मारीन असे सज्ज दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लालबाग येथील मेघवाडी सभेत दिला.
Apr 21, 2014, 09:49 PM ISTमुंबईतील राहुल गांधीच्या सभेकडे शरद पवारांची पाठ
राहुल गांधी यांनी मुंबईत बीकेसी इथं झालेल्या सभेत भाजपवर टीका केलीय. गरीब लोकांची प्रगती करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सभेत सांगितलंय.
Apr 20, 2014, 11:44 PM ISTराहूलवरचं प्रेम चुंबनाने दिसलं
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची लोकप्रियता आता वाढू लागली आहे.
Apr 20, 2014, 10:30 AM ISTमोदींचा कुरेशीवर तर बाबा रामदेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
मांसाचा व्यापारी मोईन कुरेशीचा केंद्रातल्या चार मंत्र्यांशी असलेल्या संबंधांचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. दरम्यान, काळ्या पैशांच्या मुद्यावरुन मोहीम उघडणारे योगगुरु बाबा रामदेव आता स्वत:च काळ्या पैशांच्या मुद्यावरून अडचणीत आलेत. त्यांना भाजपने पाठिशी घातलेय तर काँग्रेसने हल्लाबोल केलाय.
Apr 18, 2014, 07:38 PM ISTमोदी... विकास नाही विनाश पुरुष - उमा भारती
सध्या, भाजपच्या तिकिटावरून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या उमा भारती चांगल्याच गोत्यात आल्यात... त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे काही नेते उमा भारती यांचीच एक व्हिडिओ क्लीप जाहीर केलीय.
Apr 18, 2014, 10:48 AM ISTदक्षिण मध्य मुंबई - तिरंगी लढतीतील जातीय समीकरणं
दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत होतंय. विविध जाती-धर्मातील लोक इथं राहत असल्यानं निवडणुकीत जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आलंय.
Apr 18, 2014, 09:39 AM ISTबाळासाहेब थोरातांच्या सभेत `नमो नमो`च्या घोषणा
नरेंद्र मोदींची लाट नाही असा दावा काँग्रेस वारंवार करतयं... पण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मात्र प्रचार सभेतच मोदी लाटेचा अनुभव आला..
Apr 16, 2014, 02:27 PM ISTदेशात मोदींची हवा नाही - नगमा
देशात भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांची हवा नाही. मोदींची हवा असती तर ते सुरक्षित जागेवर निवडणूक लढविली नसती. ज्या ठिकाणी 35 ते 40 जागा भाजपने गमावल्या आहेत, त्या ठिकाणाहून निवडणूक लढविली असती तर तसे म्हणता आले असते, असा चिमटा चित्रपट अभिनेत्री आणि मेरठ लोकसभा मतदार संघातील काँग्रेसची उमेदवार नगमा हिने मोदींना काढला.
Apr 16, 2014, 01:08 PM ISTपुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.
Apr 16, 2014, 12:52 PM ISTसिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे
कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.
Apr 16, 2014, 09:17 AM ISTपुण्यात पैसे वाटण्यावरून काँग्रेस-मनसेत धुमशान
पुण्यातील रास्ता पेठेत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
Apr 15, 2014, 07:18 PM ISTयुवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना
नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.
Apr 15, 2014, 04:42 PM ISTदोन्ही काँग्रेसने जातीपातीची पिलावळ पोसली - राज ठाकरे
राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीपातीचे राजकारण करीत आहे. त्यांनीच जातीपातीची पिलावळ बोसली आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीवर केली. त्याचवेळी महायुतीला लक्ष्य केले. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार सभेत राज यांनी हल्लाबोल केला.
Apr 15, 2014, 03:40 PM ISTमोदींची काँग्रेसवर टीका, एनडीएच सत्तेत येणार - एजन्सी
आगामी लोकसभेत काँग्रेसचे खासदार शोधण्यासाठी कॅमेरे लावावे लागतील, असा टोला एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लगावलाय. झारखंडमधल्या हाजारीबागमधल्या सभेत ते बोलत होते. दरम्यान, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एका प्रख्यात एजन्सीनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.
Apr 15, 2014, 02:52 PM IST