Rishabh Pant IPL Retension 2025 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असून आज आयपीएलच्या 18 व्या सीजनसाठी सर्व फ्रेंचायझींना त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर करायची आहे. आयपीएल 2025 पूर्वी नोव्हेंबर महिन्यात नव्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होणार असून त्यापूर्वी 31 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयपीएलच्या 10 फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर करायची आहेत. आयपीएल (IPL 2025) रिटेन्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून एक मोठी माहिती समोर येत असून दिल्ली कॅप्टन ऋषभ पंतला (Rishabh Pant) रिटेन करणार नसल्याचे काही रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे.
ऋषभ पंत 2016 पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. त्याने दिल्लीसाठी आयपीएलमध्ये एकूण 111 सामने खेळले असून त्याने यात 3,284 धावा केल्या आहेत. पण आता आयपीएल 2025 पूर्वी मध्ये दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतला रिटेन करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून समोर येतंय. मात्र दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतसाठी उत्सुक नसली तरी धोनीची चेन्नई सुपरकिंग्स मात्र पंतला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती मिळतं आहे.
हेही वाचा : Mumbai Indian IPL Retention 2025: हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव
चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलच्या सुरुवातीपासूनच एम एस धोनी विकेटकीपिंग करत आहे. मात्र आयपीएल 2025 मध्ये धोनी खेळणार कि नाही याबाबत अजूनही शंका आहे. मात्र आता नाही तर अजून काही वर्षांनी धोनी रिटायर्ड होईल तेव्हा चेन्नईला नवा विकेटकिपर शोधावा लागेल. जर दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला रिटेन केलं नाही तर तो ऑक्शनमध्ये आल्यावर सीएसके त्याला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावू शकते. एम एस धोनीने आयपीएल 2024 पूर्वी मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवलं होतं. मात्र जर सीएसकेने ऋषभ पंतला घेतले तर विकेटकिपिंग, उत्कृष्ट फलंदाज आणि कर्णधार म्हणून ऋषभ पंत चेन्नई सुपरकिंग्समध्ये एम एस धोनीची जागा घेऊ शकतो. त्यामुळे चेन्नई फ्रेंचायझी पंतला खरेदी करण्यासाठी रुची दाखवू शकते.
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.