dig

विजय शिवतारेंची अजित पवारांवर सडकून टीका

एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे अशी शिवसेना दूतोंडी मांडूळ आहे असे आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्याच आरोपांना उत्तर देतांना बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती असून या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Jul 10, 2017, 09:34 AM IST

...या व्हॉटसअप मॅसेजमुळे स्वाती साठे गोत्यात!

 मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे. मंजूला शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करतायत. कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात. 

Jul 7, 2017, 09:21 PM IST

'सामना'मधून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीकास्त्र

गेल्या ६ दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या बंदला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. पण शेतकऱ्यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून सरकारला केला आहे.

Jun 6, 2017, 12:23 PM IST

'आप'ने भ्रष्टाचाराचा केल्याचा कपिल मिश्रांचा आरोप

 आपमधून हकालपट्टी झालेले आणि दिल्ली सरकारमधले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची फैर झाडली. मोहल्ला क्लिनिक प्रकरणात आपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच पार्टी फंडमध्येही प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा मिश्रा यांचा आरोप आहे.

May 14, 2017, 12:49 PM IST

जस्टीन बीबरच्या शोसाठी सेलिब्रिटींची गर्दी, आयोजकांवर तूफान तोंडसुख

सोशल मीडियात आयोजकांवर तूफान तोंडसुख

May 11, 2017, 08:33 AM IST

मस्जिदीवरील भोंग्यावर संतापला सोनू निगम

बॉलिवूडचा गायक सोनू निगमने एक ट्विट केलं आहे ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत. सोमवारी सकाळी मस्जिदवरील भोंग्याबाबत त्यांने एक ट्विट केलं. रोज सकाळी मोठ्या आवाजात मस्जिदमध्ये अझान दिली जाते.

Apr 17, 2017, 11:06 AM IST

गोमांसच्या मुद्द्यावर ओवैसींची भाजपवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. याला राजकीय रंग दिला जात आहे. खासदार असदुद्दीन ओवैसींनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे.

Apr 1, 2017, 05:49 PM IST

मुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेशवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.

Apr 1, 2017, 04:20 PM IST

भारतीय नागरिकाच्या हत्येवरुन हिलेरी यांची ट्रम्प यांच्यावर टीका

अमेरिकेत झालेल्या भारतीय इंजिनियरच्या हत्याच्या प्रकरणात हिलेरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. हिलेरीने ट्विट करत ट्रम्प यांना यावर बोलण्याची आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी सांगितलं आहे.

Feb 28, 2017, 09:47 AM IST

सोमय्या बिल्डर्सचे दलाल - खासदार राहुल शेवाळे

पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.

Feb 13, 2017, 10:27 PM IST

राज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 

Feb 8, 2017, 07:14 PM IST

गुरुदास कामत यांचं संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र

काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांनी आज पुन्हा एकदा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. निरुपम आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांना कंटाळून काँग्रेसचे दुसऱ्या फळीचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. त्याबद्दल राहुल गांधीं आणि अहमद पटेल यांनी लक्ष घालावे, असं साकडं कामत यांनी ट्विटरवर घातलं आहे.

Jan 23, 2017, 06:02 PM IST

भाजपच्या पारदर्शी अंजेड्यावर शिवसेनेचा पलटवार

राज्यात आणि केंद्रात पारदर्शी कारभार करा

Jan 17, 2017, 04:12 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसवर उपरोधक टोला

मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधक टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी लगावला आहे.

Jan 15, 2017, 06:08 PM IST

मुंबईकर नागपूरच्याच माणसाचं नाव घेतील - मुख्यमंत्री

नागभूषण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर तोंडसूख घेतलंय. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होईल तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या माणसानेच मुंबई बदलून दाखवली असं मुख्यमंत्री म्हणालेत.

Jan 2, 2017, 11:36 AM IST