खुशखबर... वीज दर कमी होणार!
राज्यातल्या जनतेसाठी एक खूषखबर आहे. राज्यात वीजेचे दर कमी करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलंय.
Dec 11, 2013, 07:02 PM ISTपृथ्वीला मिळणार चंद्रावरून वीज!
पृथ्वीवरील दिवसेंदिवस ऊर्जेचा वापर वाढत आहे त्यामुळं रोजच्यारोज ऊर्जेच्या समस्या वेगानं वाढत आहे. हा ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेऊन जपानच्या एका कंपनीनं यावर तोडगा शोधूव काढला आहे. या कंपनीनं ऊर्जेच्या समस्येवर उपाय म्हणून चंद्राच्या विषुववृत्तावर ऊर्जेच्या सौर पट्टयांचा संच लावून त्यात सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून ती पृथ्वीवर पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
Dec 3, 2013, 04:59 PM ISTस्वातंत्र्यांनंतर प्रथमच 'त्यांची' दिवाळी!
मुंबईतल्या आदिवास्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालयं. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दिपोत्सवाचा खरा आनंद साजरा केलाय.
Nov 2, 2013, 08:56 PM ISTसणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक
सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.
Sep 6, 2013, 10:02 AM ISTसचिन तेंडुलकर देणार विदर्भाला वीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाच्या पीजवरून थेट राजकीय मैदानात उतरला. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कशाला राजकारणात जातोय, सचिन! अशा प्रतिक्रिया आल्यात. मात्र, सचिनने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे ठरविले आहे. त्यासाठी सुरूवातीला ज्या गावात वीज नाही तेथे विजेची सुविधा देण्याचा संकल्प सोडला आहे.
Apr 24, 2013, 03:40 PM ISTमहाराष्ट्रात लोडशेडींग अटळ
महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडींग मुक्त होणार नाही यावर आता महावितरणनंही शिक्कामोर्तब केलंय. ज्या भागातील वित्तीय हानी मोठी आहे त्यांना लोडशेडींग न करता विज देणं महावितरणला परवडणारं नाही. त्यामुळे लोडशेडींग अटळ आहे. त्यामुळे राज्य लोड शेडींग मुक्त होणार हा राज्य सरकारचा दावा फोल ठरलाय
Dec 13, 2012, 09:23 PM ISTकचऱ्यापासून वीजनिर्मिती की पैसानिर्मिती?
डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासाठी नुकतंच विक्रोळीतल्या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. या डम्पिंगवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 18, 2012, 09:23 AM ISTअखिलेशचा आदेश अन् 'पॉवर ब्लॅक आऊट'
देशात ‘पॉवर ब्लॅक आऊट’ का झालं… दोन दिवसांत पावर ग्रीडमध्ये बिघाडानंतर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ३१ जुलैला यामुळं अर्ध्याहून अधिक भारताची बत्ती गूल झाली होती. तर ४० जुलैला आठ राज्यांत या संकटानं जनता हवालदिल झाली होती.
Aug 1, 2012, 11:31 PM IST६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प
उत्तर भारतात पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ६० कोटी जनता अंधारात आहे तर जवळपास ५०० रेल्वे गाड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नॉर्दन ग्रीडचा फटका दिल्ली मेट्रोलाही बसला आहे. मेट्रोसेवा ठप्प झाली आहे.
Jul 31, 2012, 03:11 PM ISTउत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत
उत्तर भारतातला वीजपुरवठा सुरळीत होत असून झाल्या प्रकाराची तीन सदस्यीय समिती चौकशी करेल, अशी माहिती ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीये. वीजपुरवठा केंद्रातला बिघाड, जास्त फ्रिक्वेन्सी आणि कोट्यापेक्षा जास्त वीज घेतल्यामुळं नऊ राज्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
Jul 30, 2012, 09:54 PM ISTमहावितरणचा ग्राहकांना शॉक
मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.
Jun 19, 2012, 10:07 AM ISTमुंबईकरांना 'बेस्ट' शॉक
मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी. मुंबईकरांना 'बेस्ट' शॉक! बेस्ट बसने प्रवास करणार्या प्रवाशांना महिनाभरापूर्वी बसलेला भाडेवाढीचा चटका अजूनही गरम असतानाच आता मुंबई शहराच्या कुलाबा ते माहीम-वांद्रे या पट्टय़ातील बेस्टच्या १० लाख वीज ग्राहकांनाही दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा मुंबईकरांना शॉक आहे.
May 18, 2012, 01:26 PM ISTशेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक
जळगावमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची थट्टा चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषीपंपांच्या विजेच्या मोटारी त्याच आणि विजेचा वापरही नगन्यच असतांना शेतक-यांना अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत.
May 18, 2012, 12:49 PM ISTकोयना लेक टॅपिंग पुन्हा सरू
कोयनेचं पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चौथ्या टप्प्यातील लेक टॅपिंगची तयारी पूर्ण झालीय. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.
Apr 19, 2012, 08:18 PM IST