ind vs aus

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत मिळालेल्या विजयाचे श्रेय भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांना दिलेय. यावेळी धोनीने युवा क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आशिष नेहराचे कौतुक केले.

Feb 1, 2016, 11:19 AM IST

या दोन शॉटमुळे भारताने रचला इतिहास

भारतीय संघाने सिडनीच्या मैदानावर अखेरची टी-२० जिंकत ऑस्ट्रेलियाचा १४० वर्षांचा इतिहास बदलला. आतापर्यंत दिग्गज ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले नव्हते. मात्र धोनी ब्रिगेडनेही किमया करुन दाखवली. अखेरच्या षटकांत युवीने मारलेले दोन शॉटमुळे भारताला हा इतिहास रचता आला. 

Feb 1, 2016, 09:29 AM IST

भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय. 

Jan 31, 2016, 01:53 PM IST

हेझल भडकली, युवराजला बॅटिंग का नाही दिली?

मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवराज सिंगला बॅटिंग करण्याची संधी न दिल्याने त्याची भावी जोडीदार हेझल कीच चांगलीच भडकली. युवराजला संधी न दिल्याने तिने ट्विटरवरुन तिचा राग व्यक्त केला. तिच्या ट्विटरनंतर अनेकांनी तिची खिल्ली उडवली तर काहींनी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला चुकीचे ठरवले. 

Jan 30, 2016, 03:10 PM IST

कर्णधार एमएस धोनीने रचला इतिहास

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक नवा रेकॉर्ड बनवलाय. तीनही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक स्टंम्पिग करणारा तो जगातील नंबर वन विकेटकीपर ठरलाय.

Jan 30, 2016, 11:21 AM IST

रवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला.  पाहा संपूर्ण व्हिडीओ

Jan 30, 2016, 09:16 AM IST

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, टी-२० मालिका खिशात

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत. टी-२० मालिका खिशात टाकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे. 

Jan 29, 2016, 02:01 PM IST

स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०

भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०

Jan 26, 2016, 02:15 PM IST

एक शतक आणि हा क्रिकेटपटू बनला स्टार

मनीष पांडेच्या ८८ चेंडूत नाबाद १०२ आणि रोहित शर्माच्या ९९ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. 

Jan 24, 2016, 10:50 AM IST

९९ धावांवर बाद होणारा रोहित ठरला सहावा भारतीय फलंदाज

सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात रोहित शर्माने शानदार ९९ धावांची खेळी केली. 

Jan 23, 2016, 04:31 PM IST

भारताने शेवट गोड केला

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला. 

Jan 23, 2016, 08:56 AM IST

कोहली-फॉकनरमध्ये सामन्यादरम्यान शाब्दिक बाचाबाची

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कॅनबेरा येथे झालेल्या वनडे सामन्यात भारताचा उपकर्णधार विराट कोहली आणि जेम्स फॉकनर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Jan 22, 2016, 09:25 AM IST

शिखरने विराटचा रेकॉर्ड मोडला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने भारताचा उपकर्णधार विराट कोहलीला मागे टाकत वेगवान तीन हजार धावा पूर्ण कऱण्याचा विक्रम केलाय. 

Jan 21, 2016, 10:16 AM IST

कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेच्या टॉससाठी उतरताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मटमध्ये मिळून ३०० सामन्यांचे नेतृत्व करणारा धोनी तिसरा कर्णधार बनलाय. 

Jan 17, 2016, 03:24 PM IST

मेलबर्नच्या वनडेत कोहलीने मोडला डेविलियर्सचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने वेगवान ७ हजार धावांचा टप्पा गाठला. गेल्या सामन्यात अवघ्या १९ धावांनी तो हा रेकॉर्ड तोडू शकला नव्हता. मात्र या सामन्यात त्याने जबरदस्त खेळी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सचा रेकॉर्ड मोडलाय. 

Jan 17, 2016, 10:15 AM IST