kokan railway

कोकण रेल्वे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा 'प्रभू' पावला!

कोकण रेल्वेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रभू पावलाय. देशाची राजधानी दिल्ली ते राज्याची उपराजधानी नागपूर आता बुलेट ट्रेननं जोडली जाणार आहे. दिल्ली ते चेन्नई बुलेट ट्रेन होणार आहे. त्याचा हा दिल्ली ते नागपूर असा पहिला टप्पा असणार आहे. त्यासाठी चिनी कंपनी काम करणार आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

Jun 11, 2015, 10:00 PM IST

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज! पाहा कोकणप्रेमींसाठी काय खास!

पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतांना पाहतो. ते टाळण्यासाठी यंदा कोकण रेल्वेनं काय उपाययोजना केल्यायेत पाहूयात.

Jun 10, 2015, 10:02 PM IST

कोकण रेल्वेच्या आठ विशेष तात्काळ फेऱ्या

कोकण रेल्वे मार्गावर आणखी आठ विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या वाढतच असून, गर्दीमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या फेऱ्या आहेत.

May 17, 2015, 04:13 PM IST

कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक- रेल्वेमंत्री

कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. तसंच कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. मालवण इथं रेल्वेमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं ते बोलत होते. 

Jan 11, 2015, 05:47 PM IST

दुरूस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे रडतखडत

 महाडनजीकच्या कंरजाडीनजीक रेल्वेनं दुरुस्तीचं काम काढलं आहे. यामुळे मांडवी एक्सप्रेस मागील चार तासांपासून रत्नागिरीत अडकून पडली आहे. शिवाय इतर गाड्या यामुळे खोळंबण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वेवर ओढावलेलं खोळंब्याचं विघ्न अद्यापही कायम आहे.

Aug 26, 2014, 10:36 PM IST

तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

कोकण रेल्वेवरील ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. वीर आणि करंजाडीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 7 डब्बे घसरल्यामुळं कालपासून वाहतूक ठप्प होती. 

Aug 25, 2014, 09:31 AM IST

बाप्पा! मालगाडीचे 7 डबे घसरले, कोकण रेल्वे ठप्प

कोकण रेल्वेच्या दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. करंजाडी जवळ मालगाडीचे सात डबे घसरल्यानं ही वाहतूक ठप्प झालीय. 

Aug 24, 2014, 08:50 AM IST