उद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे
एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.
Apr 15, 2014, 08:56 AM ISTनिलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर
रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.
Apr 14, 2014, 02:16 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवरही मोदीच अव्वल!
लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या देशभरात `अब की बार मोदी सरकार`चा फिव्हर चांगलाच चढलाय.
Apr 14, 2014, 11:46 AM ISTमोदी-रजनी भेटीचं खाद्य, जोक्सचा बाजार गरम!
नरेंद्र मोदी असो किंवा रजनीकांत... दोघांचं व्यक्तीमत्व कल्पनेपेक्षा भारी... रजनीकांत आपल्या सिनेमांमुळे नाही तर त्यांचे सिनेमा त्यांच्या नावावर चालतात.. सध्या मोदींबाबत एक गोष्ट कानावर पडते की ते पक्षामुळे नाहीत.. तर पक्ष मोदींमुळे आज या स्थितीत आहे.. या दोघांची लोकप्रियता त्यांना सर्व क्षेत्रात मानली जाते.. मग ते जोक्स आणि विनोदाच्या दुनियेत कशी नसेल...
Apr 14, 2014, 10:26 AM ISTसिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
Apr 14, 2014, 09:12 AM ISTआश्चर्य! काँग्रेस खासदाराचं वय ५ वर्षांत ११ वर्षांनी वाढलं!
निवडणुकीतील उमेदवारांच्या मालमत्तेप्रमाणेच सध्या उमेदवारांचे वय देखील आश्चर्यकारकपणे वाढत आहे.
Apr 13, 2014, 02:11 PM ISTदीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM ISTसोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात: उद्धव ठाकरे
सोनिया गांधींना शाही इमामांची मतं कशी चालतात? असा सवाल करत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर हल्ला चढवला.
Apr 13, 2014, 01:02 PM ISTधुळ्यात `एम` फॅक्टर कोणाला तारणार!
धुळे लोकसभा निवडणूक पूर्णपणे जातीच्या समीकरणात अडकलीय. या निवडणुकीत चार `एम` फॅक्टर काम करणार आहेत. मराठा, मुस्लिम, मोदी आणि मनी हे चार घटक कोणाच्या बाजूनं कसं काम करतात यावरच इथला विजयाचा मानकरी ठरणार आहे. या चार घटकांपैकी दोन काँग्रेसच्या तर दोन भाजपच्या बाजूनं दिसतायत.
Apr 13, 2014, 09:03 AM ISTकोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने
आजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.
Apr 13, 2014, 08:40 AM ISTकोकणात राष्ट्रवादीचा असहकार, राणेंचे डोकेदुखी वाढली
सध्या कोकणात राणे विरुद्ध राष्ट्रवादी असं धुमशान सुरू आहे. राष्ट्रवादीच्या या असहकारामुळे काँग्रेसची अर्थात राणे यांची डोकेदुखी वाढली आहे. नक्की कोकणातला हा राडा काय आहे. आणि त्याचा या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याचीच चर्चा जास्त आहे.
Apr 12, 2014, 04:31 PM IST`राजीव आणि संजय गांधींना अल्लाहनं दिली शिक्षा`
आणीबाणीच्या काळात जबरदस्तीनं नसबंदी करण्यासाठी तसंच अयोध्येच्या वादग्रस्त स्थळावर `शिलान्यास` घडवून आणण्यासाठी अल्लाहनंच संजय गांधी आणि राजीव गांधी यांना शिक्षा दिली`
Apr 12, 2014, 09:00 AM ISTनिवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.
Apr 12, 2014, 07:59 AM IST`पवारांच्या बैठकीनंतर राणेंसाठी प्रचार करायचा का?`
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात बंडखोरीचं निशाण उभारणाऱ्या सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात पक्ष नेत्यांना फारसं यश मिळाल नाही. नाराज कार्यकर्त्यांची उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच नारायण राणे यांच्याकरिता प्रचार करायचा की नाही याबाबतचा निर्णय राष्ट्रावादीचे कार्यकर्ते जाहीर करणार आहेत.
Apr 11, 2014, 07:19 PM ISTराणेंविरोधात भूमिका घेणाऱ्या सावंत यांना पक्षाची नोटीस
उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आमदार विजय सावंत यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. राणेंविरोधातील भूमिकेबाबत तात्काळ खंडन करा आणि कामाला लागा अन्यथा कारवाई केली जाईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे.
Apr 11, 2014, 06:23 PM IST