सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काहीच केलं नाही- मोदी
वडोदऱ्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दाखल झाले. सांगलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी `सांगली बनवूया चांगली`चा नारा दिला. त्यानंतर घराणेशाहीवर सडकून टीका करत घराणेशाही विकासाला खीळ बसवत असल्याचं म्हटलंय.
Apr 9, 2014, 06:48 PM ISTलोकसभा : दुसऱ्या टप्प्यातील ६ जागांसाठी आज मतदान
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सहा जागांसाठी मतदान होणार आहे.
Apr 9, 2014, 07:49 AM ISTविदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.
Apr 8, 2014, 10:05 PM ISTकोकणात राणेंविरोधात सर्व विरोधक - संजय राऊत
कोकणातील लोकसभेची निवडणूक नीलेश राणे विरुद्ध सर्व विरोधक अशी आहे. ही निवडणूक शिवसेना जिंकेल कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळेल, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात व्यक्त केलाय.
Apr 8, 2014, 09:04 PM ISTशिवसेनेची बिकट परिस्थिती, मुद्दे नसल्याने वडा, सूपवर - राणे
शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत. म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका नारायण राणेंनी पुण्यात केलीय.
Apr 8, 2014, 08:30 PM ISTराजनाथ सिंहांनी धुडकावला राज ठाकरेंचा पाठिंबा!
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी राज ठाकरेंच्या मनसेला उद्देशून चांगलाच टोला लगावलाय. `मी ऐकलंय की कुणीतरी नरेंद्र मोदींना पाठिंबा देतंय... पण मोदींना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांना महायुतीत सामील व्हावं लागेल.. किंवा त्यांना आपला पक्ष भाजपमध्ये विलिन करावा लागेल. त्याशिवाय केवळ पाठिंबा देण्याच्या भाषेला काहीच अर्थ नाही, असं राजनाथ सिंह यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.
Apr 8, 2014, 08:21 PM ISTऔरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?
औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.
Apr 8, 2014, 07:48 PM ISTपद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू
लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका निष्पाप आणि कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.
Apr 8, 2014, 04:55 PM ISTमनसे लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात `नोटा` वापरणार
लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.
Apr 8, 2014, 04:40 PM ISTएका महिन्यात तीन ड्राय डे; तळीरामांची पंचाईत
लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यानं सुरु झाल्यात... महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. यादरम्यान राज्यात तीन टप्प्यांत ड्राय डे घोषित करण्यात आलाय.
Apr 8, 2014, 04:18 PM ISTमहायुतीचा अपेक्षाभंग होऊ शकतो का?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर असतानाच राज्यातील आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज दिसुन येत आहे.
Apr 8, 2014, 01:29 PM ISTनिवडणुकीची रणधुमाळी: लक्ष्मण जगतापांचा `वासुदेव` प्रचार!
निवडणूक प्रचारात अनोखे फंडे वापरुन मतदारांपर्यंत पोहचण्याची शक्कल उमेदवार लढवतात. असाच एक प्रयोग मावळ लोकसभेचे शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सुरु केलाय.
Apr 7, 2014, 09:47 PM ISTठाणेकरांचा उमेदवारांना धक्का, स्वीकारणार `नोटा`चा पर्याय
ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिक येत्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत. डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतला हजारो टन कचरा या भागात टाकला जातो त्यामुळे नागरिक अक्षरशः गुदमरलेत.
Apr 6, 2014, 10:43 PM ISTराष्ट्रवादीचा असाही फंडा, सभेत प्रमुख वक्ता येईपर्यंत ऑर्केस्ट्रा
प्रचारसभेत मुख्य वक्ता येईपर्यंत गर्दीला खिळवून ठेवण्याची कसरत स्थानिक नेत्यांना करावी लागते. ही गर्दी कायम ठेवण्याची युक्ती पिंपरी चिंचव़डच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शोधलीय. स्थानिक नेत्यांची रटाळ भाषणं ऐकवण्यापेक्षा श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचा फंडा राष्ट्रवादीनं सुरु केलाय.
Apr 6, 2014, 09:52 PM ISTहेमा मालिनीवर निवडणूक आयोग नाराज
अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमा मालिनी पुन्हा अडणीत आल्यात. निवडणूक आयोगांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधी त्यांनी आचारसंहिता भंग केली होती. त्याप्रकणी गु्न्हाही नोंदविण्यात आला होता.
Apr 5, 2014, 01:28 PM IST